22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeKhedखेड नगराध्यक्ष वैभव खेडेकरानी स्वीकारला कचरामुक्त शहर पुरस्कार

खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकरानी स्वीकारला कचरामुक्त शहर पुरस्कार

महाराष्ट्राने स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ मध्ये देशात सर्वोत्तम कामगिरी केली असून नवी दिल्लीत झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात खेड नगर परिषदेला कचरामुक्त शहर म्हणजेच गारबेज फ्री सिटी म्हणून देशपातळीवर ३६ मानांकन मिळाले आहेत. या मानांकनामुळे संपूर्ण कोकणामध्ये खेड नगरपरिषद ‘क’ वर्ग नगर परिषद म्हणून वरचढ ठरली आहे

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगरपरिषदेला कचरामुक्त शहर पुरस्कार अंदमान निकोबाराचे उपराज्यपाल केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंञालय सचिव श्री. दुर्गा शंकर मिश्रा व छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री श्री. भूपेश बघेल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

दिवसेंदिवस कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्यामुळे अनेक ठिकाणी उघड्यावर कचरा फेकलेला दिसतो. त्यामुळे ते एकप्रकारे रोगराईला आमंत्रण देण्यासारखेच आहे. खेड पालिकेने शहरातील ओल्या व सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी विविध योजना राबवलेल्या, या विविध उपाययोजनांमुळेच खेड नगर परिषदेला राष्ट्रीय पातळीवरील कचरामुक्त शहर पुरस्कार प्राप्त झाला होता. याचा बहुमान शनिवार दिनांक २० नोव्हेंबर २०२१ रोजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी नवी दिल्ली येथे आवास शहरी कार्य मंञालय सचिव श्री. दुर्गा शंकर मिश्रा व छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री श्री. भूपेश बघेल यांच्या हस्ते पुरस्काराचा स्वीकार केला.

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत अनेक गोष्टी येतात. त्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन, सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज, स्वच्छता, शहराचा हागणदारी मुक्तीचा दर्जा, आदी घटकांचे केंद्र शासनाच्या अनेक त्रयस्थ संस्थेमार्फत व्यापक सर्वेक्षण केले जाते. या सर्वेक्षणात राज्यातील जनतेचा उत्स्फूर्त सहभाग मिळाल्यामुळे, यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये महाराष्ट्राची कामगिरी सर्वोत्तम बनली आहे.

विशेष म्हणजे सभागृहामध्ये छञपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा देत त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तर घोषणेला उपस्थित मान्यवरांनी देखील योग्य साथ दिली. याप्रसंगी सोबतीला उपस्थित मुख्याधिकारी श्री. प्रसाद शिंगटे, महेंद्र शिरगांवकर, नगरसेवक इलियास खतिब आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular