27.9 C
Ratnagiri
Saturday, June 7, 2025

गुकेश – कार्लसनमध्ये विजेतेपदासाठी चुरस – नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा

बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या विभागात अखेरच्या फेरीपर्यंत कमालीची...

रत्नागिरीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तरूणाला पकडले…

पांढरा समुद्र परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला...

उध्दव ठाकरेंचे मनसेसोबत युतीचे स्पष्ट संकेत…

गेल्या दीड महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे...
HomeTechnologyऑनलाईन पेमेंटबद्दल RBI च्या नवीन गाइड लाइन्स जारी

ऑनलाईन पेमेंटबद्दल RBI च्या नवीन गाइड लाइन्स जारी

कोरोना काळापासून ऑनलाईन बील, फूड पेमेंट, ट्रान्झॅक्शन अगदी कोणतीही इतर पेमेंट करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर अधिक प्रमाणत केला जात आहे. त्यासाठी विविध अप्लिकेशनचा वापर सुद्धा करण्यात येतो. परंतु, आता नवीन वर्षापासून ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमामध्ये काही प्रमाणात बदल घडून येणार आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँक RBI च्या नवीन गाइडलाइन्सच्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२२ पासून अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या कंपन्या किंवा झोमॅटो सारख्या ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी आपल्या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केल्यास, ग्राहकांना २०२२ पासून आपल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड्सची डिटेल्स प्रत्येक वेळी टाकावी लागणार आहे. आणि जर ग्राहकांना वारंवार डिटेल्स टाकायच्या नसतील तसेच या पर्यायापासून दूर राहायचे असेल तर आपल्या कार्डला टोकोनाइज करण्याची परवानगी त्या ठराविक प्लॅटफॉर्मला द्यावी लागणार आहे.

नवीन वर्षी म्हणजेच १ जानेवारी २०२२ पासून आपल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डची डिटेल्स ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वर सेव्ह राहू शकणार नाहीत. ग्राहकांना प्रत्येक वेळी ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करताना कार्ड डिटेल्स भरावे लागणार आहे. परंतु, ग्राहकांना वारंवार नंबर टाकण्यापासून दूर राहायचे असेल तर ई-कॉमर्स कंपन्यांना आपल्या कार्डला टोकन करण्यासाठी मंजुरी देखील देता येने शक्य आहे.

ग्राहकांना मंजुरी मिळाल्यानंतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म कार्ड नेटवर्कला आपल्या गजरेनुसार अतिरिक्त फॅक्टर ऑथेंटिकेशन सोबत डिटेल्स एन्क्रिप्ट करण्यासाठी सांगितले जाईल. त्यानंतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला एन्क्रिप्टेड डिटेल्स मिळते. यानंतर ग्राहक आगामी ट्रान्झॅक्शनसाठी कार्डला सेव्ह करू शकता. जेणेकरून वारंवार कार्ड ची माहिती भरावी लागणार नाही. परंतु, यासाठी सुद्धा व्यवस्थित सुरक्षिततेचा विचार करूनच मग पुढे क्रिया करावी. सर्व दिलेल्या गाईड लाइन्स व्यवस्थित वाचूनच पुढे जावे.

RELATED ARTICLES

Most Popular