22.2 C
Ratnagiri
Thursday, February 6, 2025

ना. नितेश राणे आता भाजपचे रत्नागिरी जिल्हा संपर्कमंत्री

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री...

पुन्हा केवायसीचा कार्डधारकांमागे ससेमिरा, शिधापत्रिकाधारकांतून नाराजी

रेशनकार्ड आधार ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना शासनाकडून...

पालू लघुपाटबंधारे योजनेला मंजुरी, किरण सामंत यांचा पुढाकार

उन्हाळ्यामध्ये टंचाईग्रस्त भागात पहिला टँकर सुरू कराव्या...
HomeMaharashtraपर्यटकांना आकर्षित करण्यासाठी स्पेशल बस उपलब्ध, महामंडळाची विशेष संकल्पना

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी स्पेशल बस उपलब्ध, महामंडळाची विशेष संकल्पना

प्रवाशांना पर्यटनाचा आनंद घेता यावा यादृष्टीने बसची बांधणी केली गेली आहे. या बसचे छत पारदर्शक असून, चालकांकडून प्रवाशांना, पर्यटकांना स्थळांची माहिती मिळावी यासाठी तशी यंत्रणाही या बसमध्ये उपलब्ध आहे.

मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे एसटी महामंडळच्या सेवा बंदच ठेवण्यात आल्याने, प्रचंड तोटा सहन करावा लागला आहे. त्यामध्ये विविध मागण्यांसाठी सुरु असलेला हा बेमुदत संप. मागील दोन वर्षापासून झालेल्या आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी, महामंडळ विविध युक्त्या शोधून काढत आहे. अशा संकल्पना ज्यामध्ये एसटीला सुद्धा फायदा होईल आणि प्रवासान सुद्धा त्याचा लाभ घेता येईल. त्यासाठी विविध प्रवासाच्या स्कीम दरवर्षी महामंडळ राबवतच असते.

आत्ता जास्तीत जास्त प्रवासासाठी एसटीचा वापर करण्यात यावा हे ध्यानात ठेवून, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने पारदर्शक छत असलेली बस सेवेत दाखल केली आहे. एसटीच्या पुण्यातील दापोडी येथील कार्यशाळेत या विशेष बसची बांधणी करण्यात आली आहे. ही बस पर्यटनासाठी वापरण्यात येणार असून, सातारा विभागाला देखील अशा प्रकारची पहिली बस ताब्यात देण्यात आली आहे.

एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. प्रवाशांना पर्यटनाचा आनंद घेता यावा यादृष्टीने बसची बांधणी केली गेली आहे. या बसचे छत पारदर्शक असून, चालकांकडून प्रवाशांना, पर्यटकांना स्थळांची माहिती मिळावी यासाठी तशी यंत्रणाही या बसमध्ये उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे, प्रवाशांना मोबाइल चार्जिग पॉईंट, अतिरिक्त सामानासाठी दोन बूथ,  बसच्या मागे बाहेरील बाजूस एलईडी मार्ग फलकाची व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रवाशांना प्रवेशासाठी केवळ पुढच्या बाजूनेच व्यवस्था केली आहे. महाबळेश्वर आगारात ही बस महाबळेश्वर दर्शन व प्रतापगड दर्शनासाठी उपलब्ध असणार आहे. दुपारी २.३० महाबळेश्वर दर्शनासाठी उपलब्ध असलेल्या या बसचे प्रवासी भाडे प्रत्येकी १०५ रुपये असून, प्रतापगडसाठी ही बस सकाळी ९.३० वाजता सोडण्यात येणार असून त्यासाठी तिकीट दर ११५ रुपये इतका आकारला जाणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular