28.7 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...

रत्नागिरीत अमली पदार्थ बाळगणारे ७ जण अटकेत

शहराजवळील भाट्ये गावामध्ये गांजा बाळगणाऱ्या ५ तरुणांविरुद्ध...
HomeMaharashtraठाकरे व पाटील घराण्यामध्ये एक नवीन ऋणानुबंध निर्माण

ठाकरे व पाटील घराण्यामध्ये एक नवीन ऋणानुबंध निर्माण

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे यांचा मंगळवार दि. २८ रोजी मुंबईत ताज हॉटेलमध्ये विवाह झाला.

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे यांचा मंगळवार दि. २८ रोजी मुंबईत ताज हॉटेलमध्ये विवाह झाला.

अंकिता पाटील व निहार ठाकरे हे उच्चशिक्षित आहेत. निहार यांचे एलएलएम पर्यंत शिक्षण झाले असून त्यांनी वकिली व्यवसायामध्ये जम बसविला आहे. अंकिता या लंडन स्कूल ऑफ इकाॅनाॅमिक्स मध्ये आणि एक वर्ष हार्वर्ड युनिवर्सिटी मध्येही शिकल्या आहेत. सध्या अंकिता पाटील पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या असून नवी दिल्ली येथील इंडियन शुगर मिल असोसिएशनच्या कायदेशीर सह समितीच्या अध्यक्षा देखील आहेत.

मागील काही दिवसांपासून या दोघांच्या विवाहाची चर्चा जोरदार सुरु होती असून, अखेर या दोघांचाही विवाह सोहळा संपन्न झाला आहे. १९९६ सालामध्ये निहार यांचे वडील बिंदुमाधव ठाकरे यांचे अपघातामध्ये निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर बाळासाहेबांना मोठा धक्का बसला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे हे निहार यांचे सख्खे काका असून, राज ठाकरे हे चुलत काका आहेत.

या विवाहमुळे ठाकरे व पाटील घराण्याचे एक नवीन ऋणानुबंध निर्माण झाला आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे अत्यंत निवडक पाहुणे व नातेवाईकांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. दरम्यान, विवाहनिमित्त ताज हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राज्यातील राजकीय,  सामाजिक क्षेत्रातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सौ. सुनेत्रा पवार यांनी देखील उपस्थित राहून वधुवरांना शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.

RELATED ARTICLES

Most Popular