26.6 C
Ratnagiri
Wednesday, August 6, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...
HomeSportsजॅवलीन आणि जॅवलीन बाय महिंद्रा, नवीन ट्रेडमार्क

जॅवलीन आणि जॅवलीन बाय महिंद्रा, नवीन ट्रेडमार्क

महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा असलेले आनंद महिंद्रा हे देशाच्या सन्मानात वाढ करण्यासाठी हातभार लावणाऱ्या प्रत्येकाचेच कौतुक विशेष प्रकारे करताना दिसतात. त्यामुळे गोल्डन बॉय नीरजच्या नावाने ट्रेडमार्क म्हणून नोंदवली जाणारी हि पहिलीच वेळ असेल.

महिंद्रा अँड महिंद्राने या वर्षी अनेक नवी मॉडेल लाँच करण्याची घोषणा केली असून नव्या एक्सयुव्ही ७०० ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाहीर केली आहेत. भारताला टोकियो ऑलिम्पिक २०२१ स्पर्धेमध्ये भालाफेक विभागामध्ये सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राच्या सन्मानार्थ आनंद महिंद्र यांनी त्याला विशेष प्रकारे डिझाईन केलेली एक्सयुव्ही गिफ्ट केली जाणार असल्याची घोषणा तेंव्हाच केली आहे. दरम्यान देशाला दीर्घ प्रतीक्षेनंतर भालाफेकीमध्ये सुवर्णपदक मिळाल्याच्या सन्मानार्थ ‘ जॅवलीन आणि जॅवलीन बाय महिंद्रा’  अशी नावे ट्रेडमार्क म्हणून नोंदविली असल्याचे समजते. नव्या एक्सयुव्ही ७०० च्या स्पेशल एडिशन मध्ये या नावाचा वापर करण्यात येणार असल्याच सांगितल जात आहे.

ही नवी एक्सयुव्ही गाडी लवकरच विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. २०२२ साली नव्या वर्षातील कंपनीचे पहिले व्हेईकल म्हणून नव्या पिढीची स्कॉर्पियो लाँच करण्यात येणार आहे. नव्या स्कॉर्पियोच्या डिझाईन आणि फिचर्स मध्ये अनेक नवनवीन बदल पाहायला मिळणार आहेत. नुकतेच कंपनीने बोलेरोचे अपडेटेड व्हर्जन निओ लाँच केले असून त्यातील एन ४, एन ८ आणि एन १० बाजारात दाखल देखील झाल्या आहेत. नवी बोलेरो निओ १० ची किम्मत साधारण १० लाख ६९ हजार रुपयांपर्यंत असणार असून, ती आकर्षक पाच कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. एन १० च्या किमतीचा खुलासा लाँचिंग करतेवेळी केला गेला होता.

RELATED ARTICLES

Most Popular