29.1 C
Ratnagiri
Tuesday, August 5, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...
HomeMaharashtraराज्यातील शाळा होऊ शकतात बंद !

राज्यातील शाळा होऊ शकतात बंद !

महाराष्ट्रात सध्या ओमायक्रॉनची सर्वाधिक रुग्ण आढळायला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना बंद ठेवायला लागले होते. त्यानंतर आता राज्यात अनेक ठिकाणी शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. पण या नव्या व्हेरीयंटचा वाढता प्रभाव लक्षात घेता, शाळा पुन्हा बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, कि महाराष्ट्रातील शाळा पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये वाढ होणार्या ओमायक्रॉन रूग्णांबाबतच्या चिंतेला उत्तर देताना ही शक्यता असल्याचे म्हटले आहे. गायकवाड यांनी सांगितले की रुग्णांची संख्या वाढली तर सरकार पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते.

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळांना लागलेले कुलूप काही आठवड्यापूर्वीच उघडले आहे. कोरोना संसर्ग कमी झाल्याने ऑन लाईन अभ्यासक्रम थांबून, विद्यार्थ्यांची पावले पुन्हा शाळेच्या दिशेने वळू   लागली आहेत. मुलांच्या उपस्थितीने शाळेचा परिसर गजबजू लागला आहे. आता सर्व पूर्ववत, सुरळीत होईल, असे वाटत असतानाच पुन्हा नवीन व्हेरीयंटचे संकट उद्भवल्याने चिंतेचे वातावरण बनले आहे.

भारतात ओमायक्रोन बाधित रुग्णांची संख्या २१३ वर गेली असून, त्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक ५४ रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे, त्या म्हणाल्या, ओमायक्रॉन हीच कोरोनाची तिसरी लाट असण्याची शक्यता असल्याने, राज्य सरकार परत एकदा शाळा बंद करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. आम्ही सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत..!”

त्याचप्रमाणे केंद्राने सुद्धा राज्यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ओमायक्रोन बाधित रुग्णवाढीचा दर अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंधांसाठी धोरणे राबविण्याच्या शिफारशी त्यात केल्याचे भूषण यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular