24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeChiplunचिपळूणमधील नवीन वाशिष्ठी पुलाचा गणेशोत्सवाआधी होणार श्रीगणेशा

चिपळूणमधील नवीन वाशिष्ठी पुलाचा गणेशोत्सवाआधी होणार श्रीगणेशा

चिपळूण मधील ब्रिटिश कालीन वाशिष्टी पूल कमकुवत झाल्याने वाहतुकीस धोकादायक बनला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुक याच मार्गाने होत असल्याने तात्पुरते डागडुजी करण्यात आलेली होती, परंतु तरीही वाहतूकीस धोका निर्माण होत असल्याने अनेकदा पावसाळ्यामध्ये वाशिष्टी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येतो.

मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण मधील बहादूर शेख नाक्यातील वाशिष्टी नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, साधारण सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या पुलाचे लोकार्पण करण्यात येईल. केंद्राने जेव्हा महामार्ग चौपदरीकरणाचे काम हाती घेतले त्यावेळी प्रथम वाशिष्टी नदीवरील नवीन पुलाचे कामकाज मंजूर करून घेऊन त्याला सुरुवात करण्यात आली. परंतु त्यामध्येही अनेक अडचणी निर्माण झाल्या. दोन-तीन ठेकेदार आपले काम अर्धवट सोडून तेथून पळून गेले. त्यानंतर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे सगळीकडे लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे अनेक कामगार आपापल्या गावी परतले, त्यामुळे पुलाच्या कामाच्या पूर्ततेसाठी कामगारच उपलब्ध नसल्याने पुन्हा त्या कामाचा खोळंबा झाला.

वाशिष्टी पुलाच्या कामासाठी खासदार विनायक राऊत यांनी विशेष सातत्यपूर्ण प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे केंद्रामध्ये पुलाच्या कामासाठी सतत पाठपुरावा करून पुलाचे काम दिवस-रात्र सुरू ठेवण्यात आले त्यामुळे कामाला गती मिळाल्यामुळे सद्य स्थितीत पुलाचे कामकाज अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. त्याचप्रमाणे पुलाचे लोकार्पण गणपती उत्सवाच्या आधी म्हणजेच सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच ठेकेदार कंपनीने तशी तयारी दर्शविली आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पुलावरून निदान एकेरी वाहतुकीला सुरुवात करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular