23 C
Ratnagiri
Monday, January 26, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRatnagiriकोकणासाठी आता जलमार्गाची नवी दारे उघडली...

कोकणासाठी आता जलमार्गाची नवी दारे उघडली…

रो-रो सेवेतून रत्नागिरीत येणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास जयगडपर्यंत होणार आहे.

कोकणवासीयांना प्रवासासाठी जलवाहतुकीचा नवा पर्याय १ सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचे बंदरविकासमंत्री नीतेश राणे यांनी जाहीर केले आहे. या रो-रो सेवेतून रत्नागिरीत येणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास जयगडपर्यंत होणार आहे. हा प्रवास तीन तासांचा असणार आहे; मात्र रत्नागिरीत रो-रो आणण्यासाठी आवश्यक जेटी नसल्यामुळे जयगड जेटीचा पर्याय निवडण्यात आल्याचे समजते. मुंबई ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलवाहतुकीचा प्रवास सुरू करण्यास राज्य सरकारला केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली आहे. माजगाव येथील भाऊचा धक्का येथून एमटूएम प्रिन्सेस या रो-रो कंपनीच्या माध्यमातून ही सेवा सुरू होणार आहे. या रो-रो सेवा सुरू होण्यापूर्वीची पूर्वतयारीची पाहणी बंदर विकासमंत्री नीतेश राणे यांनी केली. सागरी जलमार्गाद्वारे रत्नागिरी जिल्ह्यात जाण्यासाठी तीन तास व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाण्यासाठी पाच ते सहा तास इतका कालावधी लागणार आहे.

त्यामुळे कोकणवासीयांच्या प्रवासात मोठी बचत होईल, असे मंत्री नीतेश राणे यांनी जाहीर केले. मुंबईहून सकाळी ६.३० वाजता सुटणारी रो-रो तीन तासांत जयगड (रत्नागिरी) येथे पोहोचेल तर अर्ध्या तासानंतर ही बोट विजयदुर्गला रवाना होईल. दुपारी अडीच वाजता विजयदुर्गहून परतीच्या प्रवासाला निघणारी बोट रात्री नऊ वाजता पोहोचणार आहे. रत्नागिरीत येणारी रो-रो फेरीबोट ही जयगड येथील जेटीवर दाखल होणार आहे. त्या ठिकाणी या बोटीसाठी आवश्यक खोली असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईतून येणाऱ्या रत्नागिरीतील प्रवाशांना जयगडमधून अन्यत्र जावे लागेल. जयगड जेटी ही महामार्गापासून खूपच दूरवर आहे. त्यामुळे पर्यटनासाठी येणाऱ्यांसह जयगड आणि परिसरातील मुंबईकरांना याचा फायदा नक्कीच होईल.

५० चारचाकी, ३० दुचाकी क्षमता – रो-रोमध्ये इकोनॉमी वर्गात ५५२ आसनांची व्यवस्था, प्रिमियम इकॉनॉमीमध्ये ४४, बिझनेसमध्ये ४८ तर फर्स्टक्लासमध्ये १२ प्रवाशांची क्षमता असणार आहे तर ५० चारचाकी, ३० दुचाकी क्षमता असलेली ही रो-रो आहे.

RELATED ARTICLES

Most Popular