नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट कंपनी, त्याच बरोबर अन्य रासायनिक कंपन्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत आ. शेखर निकम यांनी मंगळवारी पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला. आ. निकम यांच्या आक्रमक भूमिकेने साऱ्या सभागृहाचे लक्ष वेधले गेले. पर्यावरण मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत तात्काळ बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. पाऊस सुरू झाला की टँकरमधून रासायनिक प्रदूषित सांडपाणी नदीत सोडले जाते, असा गावकऱ्यांचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी कामथे येथील नदीत अशाच पद्धतीने पाणी सोडण्यात आले होते. तर वाशिष्ठी खाडीत ही अशाच पद्धतीने पाणी सोडले जात होते. कामथे येथे नदीत प्रदूषित पाणी सोडणारे टँकर ग्रामस्थांनी पकडले होते.
आक्रमक भूमिका – आ. शेखर निकम यांनी या संदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. कंपनी आणि कामगार टिकला पाहिजे, हे खरे असले तरी जर ते जनतेच्या आरोग्यावर, अर्थकारणावर जर येत असतील तर खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दिला होता. त्या विरोधात आक्रमक लढाई लढण्याचा इशाराही आ. निकम यांनी दिला होता.
आ. निकमांनी लक्ष वेधले – मंगळवारी आ. शेखर निकम यांनी पावसाळी आशिवेशनात साऱ्या सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. पर्यावरण मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी ही गंभीर दखल घेत या संदर्भात लवकरच बैठक घेऊ आणि कारवाई करू, असे आश्वासन दिले आहे. यावर या साऱ्यावर नियंत्रण लवकर आणले पाहिजे असे आ. निकम यांनी स्पष्ट केले.
अर्थकारण आले धोक्यात – केतकी, करंबवणे, मालदोली, भिले या भागातील शेतकरी आणि मच्छीमार बांधवांचे अर्थकारण धोक्यात आले आहे. रापण टाकून मासेमारी करणाऱ्या स्थानिकांच्या उदरनिर्वाहवर गदा अली आहे ती केवळ खाडीत रासायनिक सांडपाणी सोडण्यात येत असल्यानेच असे सांगत अनेक वेळा यां संदर्भात आवाज उठवला गेला. म ात्र कोणतीही ठोस कारवाई होत नाही, असे आ. निकम यांनी सभागृहात सांगितले.
नुकसानभरपाई धोरण पाहिजे – रासायनिक कंपन्या त्यांचे सांडपाणी ज्या ज्या ठिकाणी टाकत आहेत, त्याच्यावर कुणाचे नियंत्रण आहे? नदीमध्ये किंवा खाडीमध्ये पाणी सोडल्यामुळे नुकसान झालेल्या तेथील शेतकऱ्यांना कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, यासाठी नुकसान भरपाईचे धोरण आखले पाहिजे आणि त्यातून शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे, अशी मागणी आ. शेखर निकम यांनी सभागृहात केली.