रत्नागिरीचे पालकमंत्री आणि राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडी कार्यालयामार्फत चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलेला. ३१ ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आलेली होती. मात्र, अनिल परब चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत. ईडीने नोटीस पाठवून ठराविक दिवशी हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र अनिल परब त्यांनी हजर राहू न शकण्याबाबातच कारण ईडी कार्यालयाला वकिलांमार्फत पत्राद्वारे कळवले आहे. त्याचबरोबर हजर राहण्यासाठी पुढील २ आठवड्यानंतरची वेळ मागुन घेतली आहे. अनिल परब यांनी वकिलांच्या माध्यमातून ईडीला पत्र पाठवलं असून, त्यामध्ये नमूद केले आहे कि, मी मंत्री असल्याने, माझे या दिवशी काही पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने मी चौकशीला हजर राहू शकत नाही. त्यामुळे दोन आठवड्यानंतरची वेळ मला देण्यात यावी, असं मंत्री अनिल परब यांनी पत्रात लिहिलं आहे.
त्याचप्रमाणे ईडी कार्यालयामार्फत पाठविण्यात आलेल्या नोटीसीमध्ये चौकशीचं कोणतेही कारण लिहिलेलं नाही. त्यामुळे चौकशीचं कारण स्पष्ट करावं, जेणेकरून मला ज्याची चौकशी करायची आहे, ती योग्य माहिती देता येईल, असंही पुढे नमूद केलं आहे.
अनिल परब यांनी ईडीला दिलेल्या भाजप नेते निलेश राणे यांनी चांगलाच फटकारले असून, त्यांनी ट्वीटरवर पोस्ट केले आहे कि, गेंडास्वामी घाबरला.. इतकी फाटली तर कशासाठी भानगडीत पडलास! आता लाव फोन रत्नागिरीच्या एस.पी. ला आणि विचार येतोस का वाचवायला? असे निलेश राणें यांनी ट्विट केले आहे. यावरून शिवसेना आणि भाजपची सुरु असलेली धुसपूस समोर आली आहे. राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेतील अटक प्रकरणावरून राणेंची दोन्ही मुले प्रचंड संतापली होती.