29.2 C
Ratnagiri
Sunday, July 13, 2025

सावर्डेत मत्स्यपालन, कुक्कूटपालन, कृषी पर्यटनाची शेतीला जोड

वडिलोपार्जित पारंपरिक शेतीला बाजारातील मागणीचा लाभ घेऊन...

चिपळुणात सदोष स्मार्ट मीटर बसवू नका…

स्थानिकांचा विरोध असतानाही अदानी पॉवर कंपनीने जुने...

चिपळूण घरकुलाचे स्वप्न जमीनदोस्त, तहसीलदारांकडे तक्रार

तालुक्यातील कादवड-सुतारवाडी येथील शासकीय योजनेतून मंजूर झालेल्या...
HomeMaharashtraहरिहरेश्वरमध्ये शस्त्रांसहीत मिळालेली बोट गंभीर बाब – निलेश राणे

हरिहरेश्वरमध्ये शस्त्रांसहीत मिळालेली बोट गंभीर बाब – निलेश राणे

'मला परत-परत संशय येतोय की ते गेले कुठे? कसे गेले? कोणी हे प्रकरण हलक्यात घेऊ नये.

रायगड जिल्ह्यातल्या हरिहरेश्वरच्या समुद्रकिनाऱ्याजवळ १८ ऑगस्ट २०२२ रोजी एके-४७ रायफल आणि इतर शस्त्रांचा साठा असलेली बोट आढळली होती. या बोट प्रकरणी भाजप निलेश राणे यांनी नवीन खुलासा केला आहे. हरिहरेश्वरमध्ये मिळालेली बोट नेमकी इथे कशी आली!, त्या बोटीवर कोण होतं, याबाबत अजून स्पष्टता झालेली नाही. ही फार गंभीर बाब असून सरकारने याची गंभीरपणे दखल घ्यावी अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे

कोकणात हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर दोन संशयास्पद बोटी सापडल्या. या बोटीवर शस्त्रसुद्धा सापडली होती. पण या प्रकरणाचे गुढ अजूनही कायम आहे. जी दुसरी बोट सापडली, त्या बोटीवरील फ्रीजमध्ये जेवणाचे सामान मिळाले ते ताजे होते, कुजलेले नव्हते याचा अर्थ काहीवेळा पूर्वीच बोटीवरून ते खाऊन पिऊन गेले होते, असा खळबळजनक दावा भाजपचे नेते निलेश राणे यांनी केला आहे.

त्या बोटीमध्ये काही हत्यारं सापडली. कोण होते किती होते, याची काहीच कल्पना नाही. ‘मला परत-परत संशय येतोय की ते गेले कुठे? कसे गेले? कोणी हे प्रकरण हलक्यात घेऊ नये. रायफल आणि शस्त्रांनी भरलेली बोट रायगडमध्ये समुद्रकिनारी आलीच कशी?  ‘रायगड जिल्ह्यामध्ये हरिहरेश्वरमध्ये बोट सापडली आहे. त्या बोटीवर कोण होते, त्यांच्याकडे काही सामान होते का, ते तिथून कुठे गायब झाले याबद्दल कोणतीही माहिती नाही. हे फार गंभीरबाब आहे, असं ते म्हणाले. २६/११ चा हल्ला झाला होता, त्यावेळी सुद्धा दहशतवादी असेच आले होते आणि त्यांनी अख्खी मुंबई हादरवून सोडली होती, अशी भीती राणेंनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

Most Popular