25.1 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiri“हा” प्रकल्प १००% रद्द होण्यासाठी मी प्रयत्न करणार- भाजप प्रदेश सचिव नीलेश...

“हा” प्रकल्प १००% रद्द होण्यासाठी मी प्रयत्न करणार- भाजप प्रदेश सचिव नीलेश राणे

गेल्या काही महिन्यांपासून, लांजा कोत्रेवाडी येथील डम्पिंग ग्राऊंड प्रकल्पावरून अनेक खलबत सुरु आहेत. ग्रामस्थांचा त्याला पूर्णत: विरोध असून, कोणत्याही परिस्थितीमध्ये वस्तीमध्ये हा प्रकल्प होऊ देणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. डम्पिंग ग्राऊंड प्रकल्पामुळे शेजारील परिसरामध्ये अनेक आजार रोगराई पसरू शकते असे तेथील स्थानिकांचे म्हणणे आहे.

लांजा शहरातील कोत्रेवाडी येथे होणाऱ्या डम्पिंग ग्राऊंड प्रकल्पावरून लांजा कोत्रेवाडीसह कुवे आणि आजूबाजूच्या परिसरातील शेकडो ग्रामस्थ आक्रमक झाले असून, कोणत्याही परिस्थितीत आम्हाला डम्पिंग ग्राऊंड प्रकल्प नकोच अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. ग्रामस्थांची ही भूमिका लक्षात घेऊन नगरपंचायतीमधील भाजपचे गटनेते संजय यादव यांनी नागरिकांची भूमिका लक्षात घेऊन ग्रामस्थांच्या लढ्याला पाठिंबा दिला होता. तसेच याबाबतची माहिती भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी खासदार नीलेश राणे यांना दिली होती. या डम्पिंग ग्राऊंड प्रकल्पाला विरोध दर्शवत स्थानिक नागरिक भाजप नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत, त्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

नागरिकांचा आपल्यावर असलेला विश्वास बघता भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी म्हटले कि, ग्रामस्थांची डम्पिंग ग्राऊंड प्रकल्पाची समस्या पदाधिकार्यांकडून माझ्या कानावर आली आहे, त्यामुळे हा प्रकल्पाला जर ग्रामस्थांचा विरोध असेल तर, हा प्रकल्प १००% रद्द होण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, त्याचप्रमाणे सदर प्रकरणी जिल्हाधिकारी यांची ३-४ दिवसांत भेट घेऊन ग्रामस्थांची भूमिका सविस्तर आणि स्पष्टपणे मांडणार असल्याचा शब्द त्यांनी कोत्रेवाडीतील नागरिकांना दिला आहे. तरीही कोण या प्रकरणात अरेरावी करत असेल तर, त्याला माझा नंबर द्या आणि भेटायला यायला सांगा, असे स्पष्ट सांगितले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular