25.7 C
Ratnagiri
Friday, September 30, 2022

माझ्यासोबत घडलेल्या सर्वोत्कृष्ट गोष्टींपैकी एक “ती” आहे

दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर दीपिका पदुकोण आणि...

सचिन रायपूरच्या मैदानावर आणि पावसाला सुरुवात

रोड सेफ्टी क्रिकेट मालिकेतील पहिला उपांत्य सामना...

दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांमध्ये चढाओढ

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच शिंदे गटातील नेत्यांची...
HomeSportsडायमंड लीग ट्रॉफी जिंकणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय

डायमंड लीग ट्रॉफी जिंकणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय

नीरज चोप्राने या दुखापतीतून सावरत २६  जुलैला झालेल्या लुसानेमध्ये पहिल्या प्रयत्नातच ८९.०८ मीटर भालाफेक करत टायटल आपल्या नावावर केले.

झुरिच येथे झालेल्या डायमंड लीग फायनलमध्ये नीरजची सुरुवात चांगली झाली नाही. दबावाने भरलेल्या सामन्यात नीरजचा पहिला थ्रो फाऊल गेला. मात्र दुखापतीनंतर मैदानात परतलेला नीरज दुसऱ्या प्रयत्नातच प्रतिस्पर्ध्यांपेक्षा खूप पुढे गेला. त्याने दुसऱ्या प्रयत्नात ८८.४४ मीटर अंतरावर भालाफेक केली. नीरजने तिसऱ्या प्रयत्नात ८८ मीटर, चौथ्या प्रयत्नात ८६.११ मीटर, पाचव्या प्रयत्नात ८७ मीटर आणि सहाव्या प्रयत्नात ८३.६० मीटर भालाफेक केला. नीरज चोप्रा २०१७ आणि २०१८ मध्ये डायमंड लीग फायनल्ससाठी पात्र झाला होता. तो २०१७ ला सातव्या तर २०१८ मध्ये चौथ्या स्थानावर राहिला होता.

नीरज चोप्रा लुसाने मध्ये डायमंड लीग जिंकणारा पहिला भारतीय भालाफेकपटू ठरला होता. दरम्यान नीरजने जुलै महिन्यात अमेरिकेतील जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. मात्र याच स्पर्धे दरम्यान त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला बर्मिंगहममधील राष्ट्रकुल स्पर्धेला मुकावे लागले होते. भारताच्या २४  वर्षाच्या नीरज चोप्राने या दुखापतीतून सावरत २६ जुलैला झालेल्या लुसानेमध्ये पहिल्या प्रयत्नातच ८९.०८ मीटर भालाफेक करत टायटल आपल्या नावावर केले. त्यावेळी नीरजवर दुखापतीचा काही परिणाम झालाय असे वाटत नव्हते.

नीरज चोप्राने गुरुवारी झुरिच मध्ये डायमंड लीग फायनलमध्ये प्रथम स्थान मिळवून इतिहास रचला आहे. डायमंड लीग ट्रॉफी जिंकणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय ठरला आहे. झुरिचमध्ये झालेल्या फायनलमध्ये नीरज चोप्राने ८८.४४ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह विजेतेपद पटकावले आहे. अंतिम फेरीत नीरज चोप्राने चेक प्रजासत्ताकच्या याकुब वाडलेज आणि जर्मनीच्या जूलियन वेबर यांचा पराभव केला. वाडलेज ८६.९४  मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह दुसरा आणि जर्मनीचा वेबर तिसरा आला.

RELATED ARTICLES

Most Popular