26.1 C
Ratnagiri
Tuesday, September 17, 2024
HomeSportsनीतेश कुमारचे पॅरालिंपिकमधील पहिलेच सुवर्ण…

नीतेश कुमारचे पॅरालिंपिकमधील पहिलेच सुवर्ण…

१५ व्या वर्षी आपला डावा पाय रेल्वे अपघातात गमावण्याची आपत्ती कोसळली.

भारताच्या नितेश कुमार याने सोमवारी पॅरिस पॅरालिंपिकमधील बॅडमिंटन या खेळातील पुरुष एकेरी एसएल ३ या प्रकारात सुवर्णपदक पटकावले. हे त्याचे पॅरालिंपिकमधील पहिलेच सुवर्णपदक ठरले, हे विशेष त्याने टोकियो पॅरालिंपिकमधील रौप्यपदक विजेत्या ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेल याच्यावर २१-१४, १८-२१, २३-२१ असा तीन सेटमध्ये रोमहर्षक विजय साकारला आणि सुवर्णपदक आपल्या नावावर केले. बेथेल याला पुन्हा एकदारौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

२९ वर्षीय हरियानाच्या नितेश कुमार याने सुवर्णपदकासाठीच्या लढतीत अफाट कौशल्य दाखवले. त्याने पहिला गेम २१-१४ जिंकल्यानंतर बेथेल याने दुसरा गेम २१-१८ असा आपल्या नावावर केला. अखेरच्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये कमालीची झुंज पाहायला मिळाली, मात्र नितेश कुमार याने दबावाखाली आपला खेळ उंचावला. त्याने या गेममध्ये २३-२१ अशी बाजी मारत सुवर्णपदक जिंकले. जेतेपदाची लढत एक तास व २० मिनिटे रंगली.

रेल्वेच्या अपघातात पाय गमावला – नीतेशकुमार याने वयाच्या १५ व्या वर्षी आपला डावा पाय गमावला. २००९ मध्ये विशाखापट्टनम येथे झालेल्या रेल्वे अपघातात त्याच्यावर पाय गमावण्याची आपत्ती कोसळली. वडिलांप्रमाणे नेव्ही अधिकारी होण्याचे स्वप्न त्याने बघितले होते, पण रेल्वे अपघातामुळे तो निराश झाला. मात्र, रेल्वे अपघाताच्या धक्क्यामधून तो बाहेर आला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल केले.

शिवाराजन-नित्याचे पदक हुकले – दरम्यान, याआधी भारताचे बॅडमिंटन या खेळातील ब्राँझपदक हुकले. शिवाराजन सोलाईमलाई नित्या श्री सिवन या भारतीय जोडीला सुभान- रिना मार्लिना या जोडीकडून २१-१७, २१-१२ अशी हार पत्करावी लागली. त्यामुळे भारतीय जोडीला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

RELATED ARTICLES

Most Popular