शिवसेनेचा कणकवलीतील कार्यकर्ता संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जाबाबत काल होणारी सुनावणी आज होणार आहे. मंगळवारी तब्बल चार तास याबाबत सुनावणी झाली. त्यानंतर कोर्टाने उद्या सुनावणी घेण्यात येईल, असे सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून गायब असलेले नितेश हे वडील नारायण राणे यांच्यासोबत सिंधुदुर्गात उपस्थित झाले. त्यांच्या उपस्थित होण्यावरून सुद्धा अनेक तर्क वितर्क लावून चर्चांना उधाण आले आहे.
आमदार नितेश राणे यांचे वडील केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मुलगा नितेश वर अटकेची टांगती तलवार असल्याचे लक्षात येताच, सोमवारी नागपुरातील सर्व कार्यक्रम रद्द करून कोकणात परतले आहेत. गोवा विमानतळावर नितेश आणि ते भेटल्यानंतर नारायण राणे यांनी ‘नितेश राणे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, त्यांना फुकटचे त्यामध्ये गोवले जात आहे. त्यामुळे ते लपून बसण्याचे किंवा अज्ञातवासात जाण्याचे कोणतेच कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
जिथे नारायण राणे सांगत आहेत, कि कणकवली येथील बँक निवडणुकांच्या वेळी संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यात भाजपचे कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उफ गोट्या सावंत यांचा संबंध नाही तर त्यांनी जिल्हा कोर्टात अटकपुर्व जामिनासाठी अर्ज का दाखल केला? असा सवाल सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष तथा महाविकास आघाडीच्या सहकार समृध्दी पॅनलचे प्रमुख सतिश सावंत यांनी उपस्थित करत याचे उत्तर नारायण राणे यांनी द्यावे अशी मागणी केली आहे.