27.8 C
Ratnagiri
Saturday, March 15, 2025

चिपळूण – कऱ्हाड रेल्वेमार्गाचे स्वप्न अधांतरीच, खासदार तटकरे यांचे आश्वासनही हवेत

राज्याच्या अर्थसंकल्पात चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्गासाठी आर्थिक तरतूद करण्यात...

राजापूर तालुक्यात डॉक्टर नियुक्तीमधील धरसोडीमुळे संताप

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टर नसताना कंत्राटी...
HomeSindhudurgनितेश राणेंना अखेर जामीन, निलेश राणेंची प्रतिक्रिया

नितेश राणेंना अखेर जामीन, निलेश राणेंची प्रतिक्रिया

३० हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना आणि स्वीय सहाय्यक राकेश परब यांना देखील जामीन मंजूर झाला आहे.

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार नितेश राणे यांना आज बुधवारी ९ फेब्रुवारीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही.हांडे यांच्या न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला. ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला आजे. नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मंगळवारी ८ फेब्रुवारी जामीन मिळावा म्हणून आमदार नितेश राणे यांचे वकिल, जेष्ठविधीतज्ज्ञ सतीश मानशिंदे, वकील संग्राम देसाई यांनी युक्तिवाद केला होता. तर सरकारी पक्षाच्या वतीने वकील प्रदीप घरात, वकील साळवी यांनी युक्तिवाद केला होता. त्यानंतर निर्णय देण्यात येईल असे न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार जामीन अर्जावर निर्णय देण्यात आला.

भाजप आमदार नितेश राणेंना तब्ब्येत खालवल्याने कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने संतोष परब हल्ला प्रकरणी त्यांना दिलासा दिला आहे. ३० हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना आणि स्वीय सहाय्यक राकेश परब यांना देखील जामीन मंजूर झाला आहे. यानंतर आता राणे कुटुंबियांकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे.

निलेश राणे यांनी या जामीनासंदर्भात बोलताना म्हटलंय की, आनंद वाटतोय. कोर्टाची प्रक्रिया होती त्यामध्ये आज अखेर जामिन मिळाला आहे. कोर्टात काय काय घडलं त्यावर बोलायची ही आजची वेळ नाही आहे. आज फक्त आनंदाचा दिवस आहे. जामीन मंजूर केला गेला याचा आनंद मोठा आहे. राजकीय आकसाने ही कारवाई होतेय का?  यावर ते म्हणाले की, “सत्य परेशान हो सकता है, पराजित नही, हे आज कळलं आहे”. बाकी गोष्टी योग्य वेळ आल्यावर बोलूच,  असा इशाराही त्यांनी दिला आहे

RELATED ARTICLES

Most Popular