भाजप आमदार नितेश राणे यांना अखेर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेला जामीनासाठीचा अर्ज त्यांनी आज माघारी घेत कणकवली दिवाणी न्यायालयात शरण आले. त्यानंतर झालेल्या २० मिनिटांच्या सुनावणीमध्ये त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
भाजपचे आमदार नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. कोर्टानं त्यांना दोन दिवसांची म्हणजेच ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळं राणेंना आज आणि उद्याची रात्र कणकवली पोलीसांच्या कोठडीमध्येच घालवावी लागणार आहे. त्याच बरोबर राणेंच्या वकिलांकडून जामीनासाठी अर्जही दाखल करण्यात येणार आहे.
नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी आम. नितेश राणे कोर्टात शरण येणार असल्याची माहिती दिली आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणेंनी याआधी तीनवेळा जामीन फेटाळल्यांनंतर चौथ्यांदा काल सत्र न्यायालयाने जामीन फेटळला त्यानंतर राणेंनी पुन्हा हायकोर्टात धाव घेतली आहे. मात्र आज राणेंचा वकील मानेशिंदे यांनी नितेश राणे कोर्टासमोर शरण येणार असल्याची माहिती दिली.
नितेश राणे यांनी कोर्टाचा मान ठेवून मी शरण होण्यासाठी न्यायालयात जात आहे. मी सरेंडर होण्यासाठी निघालो आहे. काल न्यायालयाने दिलेल्या निकालाचा मी आदर करतो, अशी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी आमदार नितेश राणे यांना बुधवारी रात्री उशिरा सावंतवाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यासाठी सावंतवाडी पोलिस ठाण्याला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. नितेश राणे यांना कणकवली पोलिसांनी अटक केल्यानंतर अटकेची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच त्यांना सावंतवाडीत आणण्यात आले आहे.
नितेश राणे अखेर शरण, ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
राणेंना आज आणि उद्याची रात्र कणकवली पोलीसांच्या कोठडीमध्येच घालवावी लागणार आहे.
RELATED ARTICLES