29.2 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeUncategorizedआदित्य ठाकरेंच्या अधिवेशनात एन्ट्रीवर नितेश राणेंचा म्याऊ म्याऊ

आदित्य ठाकरेंच्या अधिवेशनात एन्ट्रीवर नितेश राणेंचा म्याऊ म्याऊ

आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस. पहिला दिवस अनेक विषयांनी आणि विशेष करून शिवसेनेचे आम. भास्कर जाधव यांनी पंतप्रधानांची केलेली नक्कल आणि अंगविक्षेप यांमुळे चांगलीच गाजली.  दुसऱ्या दिवशी देखील विरोधकांनी विधान भवनाच्या पायरीवर बसून जोरदार घोषणाबाजी केली. भाजप आमदार नितेश राणेंसह भाजपचे इतर आमदार पायरीवर बसून विविध मुद्द्यांवरून सरकार विरोधात मोठमोठ्याने घोषणा देत होते.

शेतकऱ्यांना देण्यात आलेलं वाढीव बिल न भरल्यामुळे वीज कनेक्शन कापण्यात आले आहे. अनेक परिक्षा रद्द , पेपर लिक घोटाळा आदी मुद्द्यांवरून विरोधक विधानभवनाच्या पायरीवरच घोषणा देत होते. “काय म्हणाले दादा,  ठाकरे सरकार शोधून आणा..” अशा सरकार विरोधी घोषणा विरोधक देत होते. त्याचवेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे मंत्री सुनील केदार यांच्यासह विधानसभेत जात होते, त्यावेळी नितेश राणे यांनी म्याऊ… म्याऊ… म्याऊ… म्याऊ… अशा जोरजोरात घोषणा द्यायला सुरुवात केली. नितेश राणे आदित्य ठाकरे आतमध्ये जाईपर्यंत वारंवार या घोषणा देऊन स्वत:ही हसून चिडविण्याचा आनंद घेत होते.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आधीच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकमेकांचा बाप काढल्याने अधिवेशनाचं वातावरण गरम झाले होते. आणि त्यामध्येच आज विधानभवन परिसरामध्ये असा विचित्र प्रकार घडला आहे.

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे विधानसभेत प्रवेश करत असताना विधीमंडळाच्या पायरीवर आंदोलन करत असलेल्या भाजप आमदार नितेश राणेंनी आदित्य यांना पाहून म्याऊ… म्याऊच्या घोषणा दिल्या. नितेश राणे या घोषणा देत असताना भाजपचे नेते देखील त्यांच्यावर हसून मज्जा घेताना दिसले.

RELATED ARTICLES

Most Popular