24.3 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeMaharashtraउद्धव, राज, नारायण राणे हे एकत्र आले असते तर... – नितेश राणे

उद्धव, राज, नारायण राणे हे एकत्र आले असते तर… – नितेश राणे

महाराष्ट्रामध्ये केंद्रीय मंत्री राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेमध्ये उफाळलेल्या वादामुळे, राज्यात राजकारण चांगलच तापलेल. शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात झालेल्या वादाचे परिणाम, अटक प्रकरण, जामीन प्रकरण संपुर्ण महाराष्ट्रभर गाजले. पण शिवसेना आणि नारायण राणे यांच्यामध्ये खरच वाद आहे का? असेल तर तो केंव्हापासून सुरू झाला,  यावर नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी वक्तव्य केले आहे. शिवसेने बाहेर पडणाऱ्या नेत्यामध्ये वितुष्ट निर्माण व्हाव यासाठी शिवसेनेतीलचं काही नेते जबाबदार असल्याचा गौप्यस्फोट नितेश राणे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे, राज ठाकरे, नारायण राणे हे जर एकत्र आले असते तर आजच्या महाराष्ट्राचं चित्रच वेगळं असतं. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही वाईट लोकांच्या बोलण्याकडे जास्त भार देत आहेत आणि त्याचं ऐकत आहेत. नारायण राणे बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये असल्यापासूनच उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यातील संबंध खूप चांगले होते. ते चांगले संबंध काही शिवसेनेतील लोकांना खटकू लागल्याने ते बिघडवण्यासाठी विशेष प्रयत्न संजय राऊत यांनी केले आहेत. शरद पवार यांच्या सांगण्यावर संजय राऊत हे काम करत आहेत.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात भांडण लावण्याची कामे हि शिवसेनेतील नेत्यांचीच आहेत, असं स्पष्ट वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे. आमच्या दवाखान्याच्या उद्घाटनावेळी उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यामध्ये एकदम व्यवस्थित बोलणं झालं होतं. मी आणि आदित्य ठाकरे यांनी देखील समाज विकासाच्या काही गोष्टींवर चर्चा केली. त्यांनी आम्हाला शुभेच्छा देखील दिल्या. परंतु, शिवसेनेतील काही लोकांना आमच्यातील हे नात खुपलं. शिवसेनेचे अनिल परब, संजय राउत , सुभाष देसाई यांना या नात्याबद्दल घृणा निर्माण झाली. त्यांनी आमच्याविरोधात उद्धव ठाकरे यांचे कान भरले आहेत, असेही नितेश राणे हे म्हणाले आहेत. पण उद्धव ठाकरे यांना माणस ओळखून कोण जवळच आणि कोण लांबच  हे कळायला हवं होते. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या भवितव्यासाठी हे अतिशय महत्वाचं ठरणार आहे, असे नितेश राणे म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular