शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणामुळे भाजपचे आ. नितेश राणे पुरते अडचणीत सापडले आहेत. जामीन अर्जासाठी धावाधाव करत असताना आणखी एक दिवस न्यायालयीन कोठडीत मुक्काम वाढला आहे. ते मागील चार दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. पोलीस कोठडीतून सुटका झाल्यामुळे नितेश राणे जामीन अर्जासाठी धावाधाव करत आहेत. पण, रविवारची सुट्टी लागून आल्यामुळे सुनावणी सोमवारी ढकलण्यात आली होती.
मात्र सोमवारी म्हणजे आज नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालायत दुपारी २ नंतर सुनावणी होणार होती. पण, भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाल्याने, त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची कधीच न भरणारी हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून रविवार आणि सोमवार असे २ दिवस सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
नितेश राणे यांना सध्या न्यायालयीन कोठडी आहे. प्रकृती अवस्थेचे कारण देत ते जेलमध्ये न राहता, राणे यांना सिंधुदूर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्याचप्रमाणे, सरकारी वकिलामार्फत जिल्हा न्यायालयात अर्ज म्हणने मांडायला पुरेसा वेळ मिळाला नाही. अशी भूमिका सरकारी वकीलांनी मांडली. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलावी, अशी मागणी केली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सुद्धा सध्याच्या घडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जाच्या निकालाबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती. पण, आता या प्रकरणी मंगळवारी सुनावणी होणार आहे.