सिंधुदुर्ग बँक निवडणूक प्रकरणावरून शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले आमदार नितेश राणे यांचे खासगी सचिव राकेश परब सोमवारी सकाळी पोलिसांना शरण आले आहेत. जिल्हा न्यायालयात त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर गेले चार-पाच दिवस ते लपून बसले होते. सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास त्यांनी कणकवली पोलिस ठाण्यात हजेरी लावली. पोलिस निरीक्षक तथा तपासी अधिकारी सचिन हुंदळेकर यांनी त्यांची कसून चौकशी करायला सुरुवात केली आहे.
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी सर्वोच्य न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर झाले. यानंतर त्यांनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर न्यायाधीश आर.बी.रोटे यांच्या न्यायालयात प्राथमिक सुनावणी होत आहे. भाजप आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली असून आज दुपारी ३ वाजता राणे यांच्या संदर्भात न्यायालय निकाल सुनावणार आहे.
दुसरीकडे आज आमदार नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब हे पोलिसांसमोर हजार झाले असता, त्यांची चौकशी केली असता, त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना आज सकाळी कणकवली दिवाणी न्यायालयात हजर केले असता त्यांना ४ फेब्रुवारी पर्यंतची न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे आज जिल्हा सत्र न्यायालयात आमदार नितेश राणे न्यायालयाला शरण गेल्यानंतर त्यांच्या नियमित जामिनावर दुपारी ३ वाजता निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष नितेश राणेंच्या न्यायलयीन प्रक्रियेकडे लागले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयानं भाजप आमदार नितेश राणे यांना जोरदार दणका दिला आहे. त्यांचा नियमित जामीन अर्ज सुद्धा नामंजूर केला आहे.