22.7 C
Ratnagiri
Thursday, February 6, 2025

ना. नितेश राणे आता भाजपचे रत्नागिरी जिल्हा संपर्कमंत्री

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री...

पुन्हा केवायसीचा कार्डधारकांमागे ससेमिरा, शिधापत्रिकाधारकांतून नाराजी

रेशनकार्ड आधार ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना शासनाकडून...

पालू लघुपाटबंधारे योजनेला मंजुरी, किरण सामंत यांचा पुढाकार

उन्हाळ्यामध्ये टंचाईग्रस्त भागात पहिला टँकर सुरू कराव्या...
HomeSindhudurgनितेश राणेंची तब्येत ढासळल्याने, जिल्हा रुग्णालयात दाखल

नितेश राणेंची तब्येत ढासळल्याने, जिल्हा रुग्णालयात दाखल

पुढील तारीख मिळेल त्यावेळी नितेश राणे यांना जामीन मिळेल, अशी माहिती नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी दिली आहे.

संतोष परब हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना  आज दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने नितेश राणे यांना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी कणकवली कोर्टानं नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या दोन दिवसांत नितेश राणे यांना गोव्यातील राणेंच्या मालकीच्या हॉटेलमध्ये घेऊन जात त्यांची चौकशी करण्यात आली. आज पुन्हा एकदा नितेश राणे यांना कोर्टात हजर करण्यात आलं असता नितेश राणे आणि राकेश परब यांना वाढीव न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

नितेश राणेंना कोर्टात हजर करण्यात आलं. पोलिसांनी ८ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. त्यासाठी सरकारी वकिलांनी युक्तीवाद केला होता. नितेश राणे आणि राकेश परब यांच्यासाठी आम्ही युक्तीवाद केला. त्यानंतर न्यायालयाने पोलीस कोठडीची त्यांची मागणी फेटाळली. नितेश राणेंना आता न्यायालयीन कोठडीत घेण्यात आलं आहे. आता पुढील कारवाई होईल. आता लगेच सेशन कोर्टात जामीन अर्ज दाखल करण्यात येईल. आज लगेचच त्यावर सुनावणी होणार नाही. पण पुढील तारीख मिळेल त्यावेळी नितेश राणे यांना जामीन मिळेल, अशी माहिती नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी दिली आहे.

संतोष परब हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडी मिळालेल्या आमदार नितेश राणेंची काल रात्री अचानक तब्ब्येत ढासळल्याने, त्यांना रात्री सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले. नितेश राणे यांना सावंतवाडी कारागृहात न ठेवता रुग्णालयात ठेवण्यात यावे, अशी मागणी नितेश राणे यांच्या वकिलांनी काल न्यायालयात केली होती. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर १८ फेब्रुवारी पर्यंत नितेश राणेंना आज जिल्हा न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणी आमदार नितेश राणे यांनी जामीनासाठी अर्ज केला असून त्यावर शनिवारी सुनावणी करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular