23.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriखासदार झाल्यावर रत्नागिरीचा एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही : नाम. नारायण राणे

खासदार झाल्यावर रत्नागिरीचा एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही : नाम. नारायण राणे

ना. नारायण राणे यांनी मोदी सरकारने राबविलेल्या अनेक योजनांचा दाखला आपल्या भाषणात दिला.

मोदीजींना साथ द्या, त्यासाठी मला विजयी करा, मी खासदार झाल्यावर रत्नागिरीचा एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी येथे केले. भाजप सत्तेवर आल्यावर संविधान बदलणार नाही, हा आरोप करून आमच्याविरोधात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, बाबासाहेबांच्या अनुयायांना भडकविण्याचा आमच्या विरोधकांचा हा डाव आहे, अशी टीका देखील ना.नारायण राणे यांनी केली. रत्नागिरीत महायुतीच्या प्रचारासाठी झालेल्या मेळाव्यात ना. नारायण राणे बोलत होते.

ना. नारायण राणे यांनी मोदी सरकारने राबविलेल्या अनेक योजनांचा दाखला आपल्या भाषणात दिला. आमच्या पंतप्रधानांवर भ्रष्टाचाराचा आरोप तुम्ही करू शकत नाही. १० वर्षांत मोदीसाहेबांनी भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर नेली. पंतप्रधान कुठेच कमी पडत नाहीत. प्रत्येक विषयावर त्यांची कमांड़ आहे. १० वर्षांत ५४ योजना त्यांनी जाहीर केल्या. प्रत्येक योजनेच्या माध्यमातून या देशाच्या जनतेसाठी त्यांनी काम केले. कोरोनात ८० कोटी जनतेला मोफत धान्य दिले. आजही हे धान्य मोफत मिळत आहे.

११ कोटी ७२ लाख शौचालये उभारली. ८ कोटी लोकांना नळाद्वारे पाणीपुरवठा केला. पावणेचार कोटी लोकांना घरे दिली. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून गरीबांना मोफत उपचार दिले. अशी कितीतरी कामे सांगता येतील, असे ना. राणे म्हणाले. भारताचे सकल उत्पन्न म्हणजे जीडीपी वाढला. देशाची अर्थव्यवस्था कोरोना काळातही ढासळू दिली नाही, अशा मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचे आहे, यासाठी तुम्ही रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मला मतदान करा, तुमचा हक्काचा खासदार म्हणून काम करेन. खासदार झाल्यावर रत्नागिरीचा एकी प्रश्न शिल्लक ठेवणार नाही, असे आश्वासन ना. नारायण राणे यांनी दिले.

RELATED ARTICLES

Most Popular