26.7 C
Ratnagiri
Wednesday, February 5, 2025

ना. नितेश राणे आता भाजपचे रत्नागिरी जिल्हा संपर्कमंत्री

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री...

पुन्हा केवायसीचा कार्डधारकांमागे ससेमिरा, शिधापत्रिकाधारकांतून नाराजी

रेशनकार्ड आधार ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना शासनाकडून...

पालू लघुपाटबंधारे योजनेला मंजुरी, किरण सामंत यांचा पुढाकार

उन्हाळ्यामध्ये टंचाईग्रस्त भागात पहिला टँकर सुरू कराव्या...
HomeKokanयंदा सण निर्बंधमुक्त, मुख्यमंत्र्यांची कोकणासाठी विशेष घोषणा

यंदा सण निर्बंधमुक्त, मुख्यमंत्र्यांची कोकणासाठी विशेष घोषणा

शिंदे-भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर या सणांवरील बंधने मुक्त करण्यात आली आहे.

यंदाचे गणेशोत्सव आणि दहीहंडी हे उत्सव धुमधडाक्यात साजरे करण्याची तयारी सुरु झाली आहे. शिंदे-भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर या सणांवरील बंधने मुक्त करण्यात आली आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे या सगळ्याच उत्सवांवर निर्बंध आले होते. यामुळे यावेळी होणारे हे दोन्ही सण निर्बंधमुक्त होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

त्याचप्रमाणे गणेशोत्सवातील गणेश मूर्तींच्या उंचीवर निर्बंध असणार नाहीत,  मंडपांच्या नोंदणी शुल्कामध्ये देखील कपात करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकण वासियांसाठी देखील विशेष सुविधा केल्या जाणार आहेत. कोकणात गणेशोत्सवसासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल होतात. त्यांना य़ोग्य सुविधा मिळाव्यात अशा प्रमुख तीन घोषणा करण्यात आल्या आहेत. नियम पाळून आणि पर्यावरणपूरक उत्सव साजरा व्हावा, अशी इच्छा यावेळी त्यांनी व्यक्त केली.

गणेशोत्सवाच्या तयारीसाठी आधीपासूनच चाकरमानी गावी मोठ्या संख्येने जात असतात. गेले अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अशा स्थितीत दरवर्षी हा रस्ता चांगले नसल्याची ओरड करण्यात येत असते. यावेळी मात्र या रस्त्याचे काम युद्धगतीने सुरु असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच याबाबत राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून, यावेळी गणपतीच्या आधी कोकणात जाणारे रस्ते चांगले असतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

दरवर्षी प्रमाणे मुंबई, पुणे, कोल्हापूर मार्गे आणि कोकणात देखील टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांना टोलमाफीचा निर्णय घेण्यात येतो. यावेळी आषाढी एकादशीला पंढरपुरला जाणाऱ्यांसाठीही टोलमाफीच्या निर्णयाची घोषणा करण्यात आली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाप्रमाणे एसटी महामंडळ देखील यावर्षीही कोकणात जास्त बसेस पाठवल्या जाणार असल्याचे सांगितले आहे. याबाबत एसटीच्या अधिकाऱ्यांनाही बैठकीत निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular