26.7 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

मेरा ई-केवायसी अॅप टाळेल रेशनकार्ड रद्दची कारवाई

ई-केवायसी अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ३ लाख ३...

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी रत्नागिरीत बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

'माझी मुलगी सुखप्रीत हिच्याशी जसमिक सिंग याने...
HomeIndiaकर्नाटक विधिमंडळात महाराष्ट्राला एकही इंचही जागा न देण्याचा ठराव –मुख्यमंत्री बोम्मई

कर्नाटक विधिमंडळात महाराष्ट्राला एकही इंचही जागा न देण्याचा ठराव –मुख्यमंत्री बोम्मई

तसेच कर्नाटकाकडे कोणीही वक्रदृष्टीने पाहिल्यास कोणत्याही गोष्टीची पर्वा केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी महाराष्ट्राला दिला.

महाराष्ट्र-कर्नाटकप्रश्नी सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आज पुन्हा एकदा बरळले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या विरोधात मांडलेला ठराव कर्नाटकच्या विधानसभेने एकमताने मंजूर केला आहे. कर्नाटकाच्या विधिमंडळात महाराष्ट्राला एकही इंचही जागा न देण्याचा ठराव आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी माडला. त्याला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दर्शवला आहे. तसेच कर्नाटकाकडे कोणीही वक्रदृष्टीने पाहिल्यास कोणत्याही गोष्टीची पर्वा केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी महाराष्ट्राला दिला.

मध्यंतरी त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटक मध्ये येण्यास बंदी घातलेली. तसेच महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असे बोम्मई यांनी म्हणाले. सभागृहाच्या आत आणि बाहेर महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्ष नेत्यांच्या वक्तव्यांवरून असे वाटते की त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. याआधी राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही या मुद्‌द्‌यावरून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, प्रयत्न सफल होऊ शकला नाही, असे ते म्हणाले. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अशा आडमुठेपणामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील फोन वरून त्यांच्याशी संभाषण केले परंतु, तरीही त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याला प्राधान्य दिले आहे.

तसेच हा मुद्दा रस्त्यावर सोडवायचा नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही हेच सांगितले. महाराष्ट्रानेच सीमा प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि नंतर लक्षात आले की हे प्रकरण खूपच कमकुवत आहे. त्यामुळे त्यांना अशी परिस्थिती निर्माण करून त्याचा फायदा घ्यायचा होता, तो यशस्वी होणार नसल्याचे ते म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular