27.3 C
Ratnagiri
Thursday, July 31, 2025

रशिया, जपानला त्सुनामीची धडक प्रशांत महासागरात ८.८ रिश्टर तीव्रतेचा भूकप

रशियाच्या अतिपूर्वेकडील भागाला आज सकाळी साडेआठ वाजता...

लांजा विकास आराखडा रद्द होणार नाही – आमदार किरण सामंत

लांजा विकास आराखडा प्रसिद्ध झाला तेव्हा समन्वयाची...

सीआरपी महिलांचे रत्नागिरीत धरणे आंदोलन

महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित लोकसंचालित साधनकेंद्रातील...
HomeRatnagiriमिरकरवाड्यातील ३१९ बेकायदेशीर बांधकामधारकांना नोटीसा

मिरकरवाड्यातील ३१९ बेकायदेशीर बांधकामधारकांना नोटीसा

७ दिवसात येथील अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी शहरानजिकच्या मिरकरवाडा बंदरामध्ये मत्स्यव्यवसाय विभागाच्या जागेवर असलेली अनधिकृत बांधकामे हटवण्याचे निर्देश मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मत्स्य विभाग रत्नागिरी यांना दिले होते. त्यानुसार १६ जानेवारी २०२५ रोजीच्या नोटीसांव्दारे पुढील ७ दिवसात येथील अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी ३१९ धारकांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती मत्स्यव्यवसाय विभागकडून देण्यात आली आहे. दि १३ जानेवारी रोजी मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मत्स्य विभागाची बैठक रत्नागिरीत झाली होती. त्यावेळी मिरकरवाडा बंदरामध्ये मत्स्यव्यवसाय विभागाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम असलेल्या धारकांवर पोलीस विभागाचे संरक्षण घेऊन प्रशासनामार्फत सदरचे अनधिकृत बांधकाम हटविण्याबाबत ना. राणे यांनी निर्देश दिले होते. मिरकरवाडा बंदर हे महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या मालकीचे असून भूमापन क्र. ७३/०२ मध्ये १०.८४ हे. आर एवढे क्षेत्र आहे.

सदरच्या शासकीय जागेत कोणतेही बांधकाम करण्यास सक्त मनाई आहे. तरी सुद्धा या जागेमध्ये सुमारे ३१९ अनधिकृत बांधकामे अस्तित्वात आहेत. सदरचे अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, मिरकरवाडा यांचे मार्फत बहुतांश वेळा नोटीस देण्यात आली आहे. मात्र अद्यापही अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर मत्स्य व्यवसाय विभागाने आता कारवाईचा बडगा उचलला आहे. त्यामुळे दि. १६/०१/२०२५ रोजीच्या नोटीसांव्दारे पुढील ७ दिवसात अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी, ३१९. धारकांना कायदेशीर नोटीस बजावणी करण्यात आली आहे. तरी मिरकरवाडा बंदरात प्राधिकरणाच्या कक्षेतील अनधिकृत बांधकाम धारकांनी विहित मुदतीच्या आत आपले अनधिकृत बांधकाम हटविण्यात यावे अन्यथा सदरचे बांधकाम प्रशासनाकडून हटविण्यात येऊन सदरचा खर्च संबंधिततांकडून वसूल करण्यात येईल असेही मत्स्य व्यवसाय विभागाकडून सांगण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular