24.4 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

वाहतूक कोंडीत अडकले राजापूर शहर…

दिवसागणिक वाहनांची आणि वाहने वापरणाऱ्यांची संख्या वाढत...

सवलतीच्या लाभासाठी ‘लालपरी’ला पसंती – रत्नागिरी विभाग

राज्य परिवहन महामंडळातर्फे लाडक्या लालपरीतून प्रवास करणाऱ्या...

दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तांनी दिला भावपूर्ण निरोप

जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणेशोत्सवाची गुरूवारी थाटामाटात सांगता...
HomeChiplunचिपळुणात ४८ संकुले, इमारतींना नोटीस

चिपळुणात ४८ संकुले, इमारतींना नोटीस

शहरातील अनेक इमारतींना पार्किंगची व्यवस्था नाही.

शहरात काही ठिकाणी पालिकेने जमिनीखाली पार्किंगची परवानगी दिली आहे. पावसाळ्यात त्या ठिकाणी पाणी साठून तलाव तयार झाले आहेत. तेथील रहिवाशांनी आणि वाहनचालकांनी आपल्या वाहनांचे पार्किंग कुठे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील वाढत्या वाहतूककोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी पालिका प्रशासनाने ४८ व्यापारीसंकुले व इमारतींना पार्किंगसंदर्भात गंभीर उल्लघन केल्याबद्दल नोटिसा बजावल्या आहेत. येत्या सात दिवसांत आवश्यक सुधारणा न झाल्यास थेट दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा पालिकेने दिला आहे. शहरातील अनेक व्यापारीसंकुले व खासगी इमारतींनी बांधकाम परवान्याच्या अटींनुसार, पार्किंगची सोय न करता ती जागा व्यापारी उपयोगासाठी वळवली आहे. परिणामी, रस्त्यावर वाहनांचा ताण वाढत असून, वाहतूककोंडी अधिकच गंभीर होत आहे. विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत शहरातील प्रमुख रस्त्यांवर गोंधळ निर्माण होत आहे.

आगामी गणेशोत्सव काळात शहरात भाविकांची मोठी गर्दी येणार असल्याने वाहतुकीचा प्रश्न अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पालिका प्रशासनाने वेळीच कठोर भूमिका घेत पार्किंग व्यवस्थेतील त्रुटींवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेने पाठवलेल्या नोटिसांमध्ये संबंधित व्यापारीसंकुले व इमारतींच्या मालकांना सात दिवसांत योग्य पार्किंगची सोय उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहे. या कालावधीत सुधारणा न झाल्यास जागा सील करणे, दंड आकारणे अशा कठोर कारवाया केल्या जातील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पालिकेचे अधिकारी स्वतः प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई करतील. नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांना कोणतीही सवलत न देता कठोर कारवाई होईल, असा इशारा देण्यात आला आहे.

व्यावसायिक इमारतीही पार्किंगशिवाय – शहरातील अनेक इमारतींना पार्किंगची व्यवस्था नाही. व्यावसायिक इमारतीसुद्धा पार्किंगशिवाय उभ्या आहेत. चिंचनाका येथील सातमजली इमारतीला जमिनीखाली पार्किंगची व्यवस्था देण्यात आली आहे. त्या ठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular