26.9 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

मेरा ई-केवायसी अॅप टाळेल रेशनकार्ड रद्दची कारवाई

ई-केवायसी अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ३ लाख ३...

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी रत्नागिरीत बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

'माझी मुलगी सुखप्रीत हिच्याशी जसमिक सिंग याने...
HomeChiplunचिपळुणात प्लास्टिक संकलनाचे होणार आता 'गुगल मॅपिंग'

चिपळुणात प्लास्टिक संकलनाचे होणार आता ‘गुगल मॅपिंग’

बॉक्समुळे शहरातील प्लास्टिक संकलनाच्या कामाला मोठी मदत मिळाली आहे.

चिपळूण शहरात प्लास्टिक संकलनासाठी ४१ बॉक्स ठेवण्यात आले आहेत. नागरिकांना ते समजावेत यासाठी गुगल मॅपिंग करण्यात आले आहे. त्यामुळे चिपळूण शहरात प्लास्टिक संकलनाच्या कामाला आणखी गती मिळाली आहे. चिपळूणचे उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या पुढाकाराने व चिपळूण पालिका, सह्याद्री निसर्ग मित्र चिपळूण यांच्या संयुक्त प्रयत्नाने, चिपळूणमधील विविध संस्था, व्यक्ती, शासकीय कार्यालये या सर्वांच्या लोकसहभागातून चिपळूणमध्ये ४१ प्लास्टिक बाटल्या व संकलन बॉक्स बसवण्यात आले आहेत. बहादूरशेख ते गोवळकोट धक्का तसेच रेल्वेब्रीज ते पागनाका या संपूर्ण चिपळूण परिसरात विविध मोक्याच्या ठिकाणी ते ठेवण्यात आले आहेत.

या बॉक्समुळे शहरातील प्लास्टिक संकलनाच्या कामाला मोठी मदत मिळाली आहे. सह्याद्री निसर्गमित्र संस्थेने या बॉक्समधील प्लास्टिक संकल्नासाठी स्वयंसेवकांची नेमणूक केली आहे. आता या बॉक्सचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रत्येक पिंजऱ्याचे फोटो लोकेशन गुगल मॅपवर दाखवण्यात आले आहे. त्यामुळे ठराविक गुगल मॅपच्या लिंकवर जाऊन झूम केल्यावर सर्व ४१ पिंजरे लोकेशन पॉईंटद्वारे दिसतात. लोकेशन पॉईंटवर क्लीक केल्यावर तेथील पिंजऱ्याचा फोटो दिसतो. परत फोटोवर क्लीक केल्यावर मोठा फोटो पाहता येतो. सर्व पिंजऱ्यावर ज्यांनी देणगी दिली त्याचे नाव टाकण्यात आले आहे. या पिंजऱ्यातील बाटल्या प्रत्येक महिनाअखेर चिपळूण पालिका व सह्याद्री निसर्गमित्र गोळा करत असून, त्या रिसायकलिंगला पाठवण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular