25.9 C
Ratnagiri
Sunday, September 24, 2023
HomeChiplunआता लढाई सुरू झालीय…. संघर्षाला तयार व्हा ! - आमदार जाधव

आता लढाई सुरू झालीय…. संघर्षाला तयार व्हा ! – आमदार जाधव

शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी खेर्डी येथील मेळाव्यातून थेट रणशिंग फुंकले.

आता लढाई सुरू झाली आहे… संघर्षासाठी तयार व्हा आपसातील हेवेदावे, रुसवे फुगवे विसरा…तुम्ही उभी केलेली बाळासाहेबांची शिवसेना शिवसेना अडचणीत आहे…, अशा …. तुम्ही फक्त साथ काळात एकत्र या…..गुहागर तर जिंकणारच आहे… द्या…. पण यावेळी चिपळूण संगमेश्वर देखील  यावेळी जिंकणार म्हणजे जिंकणारच….! आशा शब्दात शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी खेर्डी येथील मेळाव्यातून थेट रणशिंग फुंकले. चिपळूण खेर्डी येथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता मेळावा तालुकाप्रमुख विनोद झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते व खेर्डी विभाग शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर जिल्हाप्रमुख सचिन कदम, उपजिल्हाप्रमुख प्रतापराव शिंदे, क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख विनोद झगडे, धाकटुशेठ खताते तसेच महिला आघाडीचे पदाधिकारी, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा चित्राताई चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

फक्त शिवसेनाप्रमुखांचे विचार – उपस्थितांना मार्गदर्शन करताना आम.भास्कर जाधव म्हणाले मी जेव्हा तालुकाप्रमुख झालो त्यावेळी तालुक्यात कोळकेवाडी वगळता एकही ग्रामपंचायत सेनेकडे नव्हती, ना आमदार, खासदार ना नगरसेवक, एकसुद्धा पंचायत समिती सदस्य, जिल्हापरिषद सदस्य नव्हता. फक्त होते ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार होते. त्या विचारावरच शिवसेना येथे उभी राहिली. तेच तुम्हाला करायचे. आहे, असे ते म्हणाले. जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांना माझा निरोप द्या, शिवसेना अडचणीत आहे सांगा, तुम्हाला आता बाहेर पडायला लागेल सांगा, अशा शब्दांत त्यांनी जुन्या शिवसैनिकांना आर्त साद घातली.

पाचही जागा जिंकायच्या – राजापूर तर राजन साळवी जिंकणारच आहेत. रत्नागिरी देखील जिंकणार, उमेदवार नसेल तर मी स्वतः देखील रत्नागिरीत लढायला तयारच आहे. खेड दापोली संजय कदम ताकदीने जिंकेल, गुहागर तर सहज जिंकणार, पण यावेळी चिपळूण संगमेश्वर देखील जिंकणार म्हणजे जिंकणारच, तुम्ही फक्त साथ द्या, बेरजेंची गणिते मी करतो. संगमेश्वर आणि देवरुखपर्यंत दौरा करून आढावा घेतला आहे. काळजी करण्याचे कारण नाही. आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय आता स्वस्थ बसायचे नाही असेही ते म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular