26.7 C
Ratnagiri
Monday, October 14, 2024

iPhone 13 128GB च्या डिस्काउंट ऑफरने सर्वांना आनंद दिला…

ई-कॉमर्स वेबसाइट Amazon सणासुदीच्या काळात ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक...

महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज भारताला ऑस्ट्रेलियाचे आव्हान

भारतीय संघासमोर महिला ट्वेन्टी- २० विश्वचषक स्पर्धेत...

‘भूलभुलैया ३’ मध्ये माधुरी दीक्षित-विद्या बालन आमनेसामने

विनोदी भयपटांच्या प्रवाहात यशस्वी ठरलेल्या 'भूलभुलैया' चित्रपट...
HomeRatnagiriजिल्ह्यात १ लाख ६६ हजार ९८६ घरगुती तर ११६ सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना

जिल्ह्यात १ लाख ६६ हजार ९८६ घरगुती तर ११६ सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना

गणेशोत्सवासाठी प्रशासनासह पोलीस दलही सज्ज झाले आहे.

कोकणातील सर्वात महत्वाचा समजला गणोशोत्सवाची जय्यत तयारी प्रत्येक घराघरात सुरु आहे. बाजारपेठा सजल्या आहेत. चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहे. मंगळवारी प्रत्येक घरी बाप्पाचे वाजात गाजत आगमन होणार असून जिल्ह्यात १ लाख ६६ हजार ९८६ घरी तर ११६ सार्वजनिक मंडणांमार्फत बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. गणेशोत्सवासाठी प्रशासनासह पोलीस दलही सज्ज झाले आहे. रत्नागिरी जिल्हयामध्ये १ लाख ६६ हजार ९८६ घरगुती गणपती तर ११६ सार्वजनिक गणेशोत्सावाची प्रतिष्ठापना होणार आहे.

त्यामधील ११ हजार ९८४ दीड दीवसांचे गणपती आहेत. घरच्या गणपती बाप्पासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागांतून चाकरमानी गावी येतात. गुहागरमधील शफंगारतणीमध्ये शफंगारतणीचा राजा व निणकंठेश्वर सार्वजनिक गणपतीचे आयोजन केले जाते. गुहागर शहरामध्ये घरगुती गणपतीमध्ये मोठया मोठया मूर्त्यांची स्थापना केली जाते. अनेक ठिकाणी चलचित्र देखावे पाहावयास मिणतात. प्रतिवर्षी वेगवेगणया प्रकारचे चलचित्र साकारले जाते.

गुहागर पोलिस स्थानक, गुहागर महावितरण याही ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो. रत्नागिरीमध्ये श्री रत्नागिरीचा राजा, रत्नागिरीचा राजा आठवडा बाजार, बंदर रोड मित्रमंडण गणेशोत्सव, टिणक आणीतील सार्वजनिक गणेशोत्सव, शांतिनगरचा राजा, उद्यमनगरचा राजा, तसेच सार्वजनिक बांधकाम शासकीय रुग्णालय नगरपरिषद भूमिअभिलेख पाटबंधारे जिल्हा विशेष कारागफह अशा विविध कार्यालयांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो.

RELATED ARTICLES

Most Popular