23.9 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeChiplunसुनावणीपूर्वीच फेरसर्वेक्षणाला विरोध - शिवसेना ठाकरे गट

सुनावणीपूर्वीच फेरसर्वेक्षणाला विरोध – शिवसेना ठाकरे गट

परवानगी प्रशासनाकडे मागण्यात आली; परंतु, प्रशासनाने परवानगी दिली नाही.

चिपळूण पालिकेने वाढीव घरपट्टीबाबत २८ सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदवल्यावर सुनावणीनंतरच फेरसर्वेक्षण करावे. सुनावणी अगोदर सुरू झालेल्या फेरसर्वेक्षणाला विरोध आहे, अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख शशिकांत मोदी यांनी पत्रकार परिषदेद्वारे जाहीर केली आहे. नव्याने करआकारणी करण्यात आलेल्या घरपट्टीबाबत चिपळूणवासीयांनी नाराजी व्यक्त करत येथील नगरपालिकेवर धडक दिली. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेदेखील धडक देत मुख्याधिकारी विशाल भोसले यांना निवेदन दिले होते. यावर ज्या नागरिकांना घरपट्टी वाढली आहे असे वाटत असेल अशा नागरिकांनी २८ डिसेंबरपर्यंत चिपळूण पालिकेत अर्जाद्वारे हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन भोसले यांनी शिवसेना उबाठाच्या शिष्टमंडळाला केले होते. यानुसार चिपळूण नगर पालिकेत घरपट्टीधारक वाढीव घरपट्टीबाबत हरकती नोंदवत आहेत; मात्र, चिपळूण पालिकेने हरकती नोंदवून घेण्याबरोबरच फेरसर्वेक्षणाला सुरवात केली आहे.

यावर शिवसेना उबाठा पक्षाने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. शहरप्रमुख शशिकांत मोदी यांनी सांगितले, वाढीव घरपट्टीबाबत प्रथम शिवसेना उबाठा पक्षाने चिपळूण पालिकेवर धडक देत मुख्याधिकारी विशाल भोसले यांना निवेदन दिले. या वेळी पालिकेने २८ डिसेंबरपर्यंत हरकती नोंदवण्यास सांगितले. याबाबत आमचे कोणतेही दुमत नाही; परंतु, प्रथम हरकतींवर सुनावणी व्हावी यासाठी जे घरपट्टीधारक आहेत त्यांना याची पूर्वकल्पना देण्यात यावी नंतर फेरमोजणी कधी होणार आहे, याची देखील माहिती देण्यात यावी; मात्र, आता सुनावणीअगोदर फेरसर्वेक्षण सुरू झाले आहे. या सर्वेक्षणाला आमचा विरोध आहे, असे मोदी यांनी या वेळी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला तालुकाप्रमुख विनोद झगडे, माजी नगरसेवक संजय रेडीज, विकी नरळकर, सचिन कदम, पार्थ जागुष्टे, संतोष पवार आदी उपस्थित होते.

साखळी उपोषणाला परवानगी नाही – आम्ही घरपट्टीधारकांना न्याय मिळवून देण्याच्यादृष्टीने २३ ते २५ डिसेंबरला चिपळूण नगरपालिकेसमोर साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी परवानगी प्रशासनाकडे मागण्यात आली; परंतु, प्रशासनाने परवानगी दिली नसल्याचे मोदी यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular