25.8 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriशिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीला अनेक पदाधिकाऱ्यांची दांडी; ना. सामंतांची तीव्र नाराजी

शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीला अनेक पदाधिकाऱ्यांची दांडी; ना. सामंतांची तीव्र नाराजी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत.

महायुतीच्या माध्यमातून अनेक विकास कामे सुरु आहेत. परंतु त्याची माहिती मतदारांपर्यंत जाते का, पदाधिकारी कोणताही कार्यक्रम स्वतःहून आयोजित करीत नाहीत अशी स्पष्ट नाराजी राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी व्यक्त केली. शिवसेनेची रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी बैठक शनिवारी रत्नागिरीतील देसाई बँक्केट हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी जिल्हा कार्यकारीणीच्या उपस्थितीवरुन स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यत कोट्यवधीची कामे सुरु आहेत. प्रत्येक जिल्हा परिषद गटात ही कामे आहेत. परंतु तेथील पदाधिकारी स्वतःहून काहीच करीत नाहीत. अनेकदा मंत्र्यांनाच कार्यक्रम लावावे लागतात. पदाधिकाऱ्यांशी बोलावे लागते. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. त्याची तयारी पदाधिकाऱ्यांनी स्वतः सुरु केली पाहिजे. शासनाकडून सुरु असलेल्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचल्या पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात जवळपास ८८ हजार सदस्य नोंदणी झाली आहे.

एक लाखाचे उद्दीष्ठ ठेवण्यात आले आहे. त्यासाठी घराघरात पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांनी गेले पाहिजे असे ना. सामंत यांनी सांगितले. खेड, मंडणगडमध्ये पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला मला बोलवावे, रत्नागिरी, राजापूरमध्ये पदाधिकाऱ्यांनी योगेशदादांना बोलवावे मात्र पदाधिकारी आपल्याच मंत्र्यांना बोलावत नाहीत. आपला पक्ष वाढीसाठी जे काय करता येईल ते पदाधिकाऱ्यांनी केले पाहिजे, आम्ही तुमच्या सोबत असल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले. या बैठकीला मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री योगेश कदम, माजी आमदार संजय कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीतील जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते. मात्र अनेक पदाधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने ना. सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. ही पदाधिकारी-कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे प्रत्येकाने यासाठी काम केले पाहिजे. आपण कसे वरचढ आहोत हे दाखवण्यासाठी, एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी निवडणुकीला उभे राहू नका, त्यातून पक्षाचे नुकसान होते. आपला प्रत्येक कार्यकर्ता हा विजयी झाला पाहिजे, त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन उमेदवार दिला पाहिजे, असे मत मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केले. खेड-दापोली मतदार संघात माजी आम दार संजय कदम यांचा प्रवेश शिवसेनेत झाल्यामुळे शिवसेनेची ताकद ९९ टक्के झाली आहे. त्यामुळे ताकदीनुसार शिवसेनेला न्याय मिळायला हवा असे स्पष्ट मत मांडले.

RELATED ARTICLES

Most Popular