26.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeChiplunनालायक अधिकाऱ्यांना उलटे टांगून झोडपले पाहिजे, आम. भास्करशेठ जाधव

नालायक अधिकाऱ्यांना उलटे टांगून झोडपले पाहिजे, आम. भास्करशेठ जाधव

शेतकऱ्याच्या ५ म्हशी मरतात आणि त्याकडे कोण ढुंकूनही बघत नाही.

महाराष्ट्राचे सरकार हे बेमुर्वतखोर आहे. या सरकारचा कोणत्याही विभागावर, अधिकाऱ्यावर, प्रशासनावर अजिबात वचक राहिलेला नाही. एका गरीब शेतकऱ्याच्या ५ म्हशी मरतात आणि त्याकडे कोण ढुंकूनही बघत नाही, अशा नालायक अधिकाऱ्यांना उलटे टांगून मारले पाहिजे, अशा शब्दांत आमदार भास्करराव जाधव यांनी आपला संताप व्यक्त केला. नूतनीकरण केलेल्या संपर्क कार्यालयाच्या उदघाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नुतनीकरण केलेले कार्यालय बघा, त्याचा बोर्ड बघा, सर्व फोटो बघा, आणि तुम्हीच ठरवा, मी नाराज आहे, की खुश आहे, असेही ते हसत-हसत म्हणाले. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील संपर्क कार्यालयाचे नुतनीकरण करण्यात आले. दरम्यान मंगळवारी आ. जाधव यांच्या पत्नी सौ. सुवर्णा जाधव यांचा वाढदिवस असल्याने त्याच दिवशी नुतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन आमदार भास्कर जाधव व सौ. सुवर्णा जाधव यांच्याहस्ते पार पडले. यावेळी शिवसैनिकांसह सर्वसामान्य नागरिकांना देखील मोठी गर्दी केली होती. उदघाटनाचा कार्यक्रम पार पडताच उपस्थित पत्रकारांशी आम. भास्करराव जाधव यांनी संवाद साधला.

गरीब शेतकऱ्याची व्यथा – त्याचवेळी प्रमोद कदम हे अत्यंत गरीब शेतकरी आपली व्यथा घेऊन आले होते. त्यांच्या ५ म्हशी विजेच्या तारेचा शॉक लागून मरण पावल्या. तर एक म्हैस मरणावस्थेत आहे. त्याची दखल अद्याप कोणीही घेतलेली नाही. त्या गरीब शेतकऱ्याची व्यथा ऐकताच आम. जाधव कमालीचे संतापले. विजेची तार तुटून त्या म्हशींवर पडली ही चूक महावितरण व तेथील अधिकाऱ्यांची असताना तुम्ही दुर्लक्ष करता? काय करायचे त्या शेतकऱ्याने? अशा नालायक अधिकाऱ्यांना उलटे टांगून झोडपले पाहिजे, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त करत मी आता त्यांना घेऊन थेट महावितरण कार्यालयात जात आहे, असेही ते म्हणाले. सिंधुदुर्गपासून दौरा आम. जाधवांनी यावेळी अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरे देखील दिली.

आगामी निवडणुका पाहता पदाधिकारी व शिवसैनिक मला बोलवत आहेत. त्यांना खंबीर साथ देणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे निश्चितच माझी जबाबदारी वाढली असून मी सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून आता दौरा करणार आहे. विरोधक आता अमाप पैसा वापरून फोडाफोडीचे राजकारण करत आहेत. त्यांना उत्तर द्यायाचे असेल तर थेट मैदानात उतरून आपल्या कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे आणि ते मी करणार आहे, असेही ठामपणे आम. जाधव म्हणाले.

सामंतांनी पैसे वाटले असे म्हटले नाही – ना. उदय सामंत यांनी माझ्या मतदारसंघात पैसे वाटले असे मी कधीही बोललो नाही. पोलिसांच्या गाडीतून पैसे आणून माझ्या मतदारसंघात वाटले गेले असे मी बोललो आणि त्यावर आजही ठाम आहे. उदय सामंत यांचा द्वेष मी कधीच केला नाही. त्यांना मंत्रीपदे मिळाली, हे त्यांचे कौशल्य आहे. त्यांनी माझ्या बद्दल सद्भावना व्यक्त केली असे मी ऐकले. मी त्यांना धन्यवाद देतो, असेही दिलखुलासपणे आम. जाधव म्हणाले. रामदासभाई कदम यांनी केलेल्या टिकेबद्दल बोलताना आम. जाधव म्हणाले त्यांच्या टिकेला मी जास्त महत्व देत नाही आणि तुम्ही देऊ नका, असे सांगत त्यांनी तो विषयं बेदखल केला.

RELATED ARTICLES

Most Popular