28.2 C
Ratnagiri
Saturday, February 7, 2026

रत्नागिरीत पार्किंगच्या जागेत बाग – स्मार्ट सिटी योजना

शहरातील मारुती मंदिर स्टेडियमच्या बाजूला असणाऱ्या पार्किंगच्या...

विमान अपघाताच्या चौकशीत धक्कादायक बाब आली समोर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीला...

शनिवारच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज, पोलिसांचांही तगडा बंदोबस्त

रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक...
HomeRatnagiriशिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी...

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

या मंत्र्यांच्या खात्यातही भाजपने विश्वासू अधिकारी नेमल्याचे दिसत आहे.

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी मर्जीतील अधिकारी खात्यात बसवले आहेत. या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या जात आहेत, असा घरचा आहेर महायुतीमधील घटक पक्ष शिवसेनेचे नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिला आहे. को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लाईज युनियनसंदर्भात रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी महायुतीत आलबेल नसल्याचे मान्य केले. ते म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सर्वांना विश्वासात घेऊन काम केले होते. अनेक लोकोपयोगी योजना राबवल्या. त्यामुळेच महायुतीची सत्ता मोठ्या फरकाने आली; परंतु आता मुख्यमंत्री बदलल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अन्य मंत्र्यांच्या खात्यातील फाइली जाणीवपूर्वक बाजूला काढल्या जात आहेत.

या मंत्र्यांच्या खात्यातही भाजपने विश्वासू अधिकारी नेमल्याचे दिसत आहे. या गोष्टी आता लपून राहिलेल्या नाहीत, त्या चर्चेत येत आहेत. हे सर्व जाणीवपूर्वक घडवून आणले जात आहे. “मराठा समाजाला शासनाने १० टक्के आरक्षण दिले आहे; परंतु ओबीसीमधून आरक्षण मिळावे, हा हट्टपणा आता जरांगे पाटील यांनी सोडला पाहिजे. ऐन गणपतीच्या सणात मुंबईची कोंडी होत असून, त्याची झळ सर्वसामान्यांना बस्तै आहे. हा एक प्रकारचा अघोरीपणा आहे, असे मत अडसूळ यांनी व्यक्त केले तसेच जरांगे पाटील यांच्यामागे कोण आहे, याचा शोध लागत नसल्याचा या प्रसंगी आवर्जून सांगितले.

मोठा भाऊ कोण यावरून वाद होतील नाग – उद्धव राज व ठाकरें यांच्या भेटीबाबत ते म्हणाले, “बाळासाहेबांच्या नेतृत्वाचा दर्जी अन्य कोणामध्येही नाही. पूर्वी काहींची लोकांमध्ये क्रेझ होती; परंतु लोकांनौ दोघांमधील फरक पाहिला आहे. फक्त आक्रमक भाषणं केली म्हणजे होत नाही. आता तेच दोघे एकत्र आल्यास मोठा भाऊ कोण यावरून वाद होऊ शकतो दोघांची युती झाली. तरी मुंबई महापालिकेत विशेष परिणाम जाणवणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

Most Popular