21.4 C
Ratnagiri
Wednesday, January 28, 2026

जिल्ह्यात गुप्त बैठकांचा जोरात धडाका उमेदवारांची पडताळणी, रणनीतीला वेग

जिल्ह्यात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होताच...

अपघाती जखमींना ‘कॅशलेस’ उपचार, मदतीसाठी धावणाऱ्यांनाही २५ हजार !

रस्ते अपघातानंतर जखमींच्या जीवितासाठी अत्यंत निर्णायक ठरणाऱ्या...

अर्ज भरले; आता माघार घेण्यासाठी नेत्यांची मोर्चे बांधणी

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर...
HomeRatnagiriइलेक्ट्रिकल स्कूटरच्या दुरुस्तीपोटी तरुणाची ऑनलाईन फसवणूक

इलेक्ट्रिकल स्कूटरच्या दुरुस्तीपोटी तरुणाची ऑनलाईन फसवणूक

श्री. नांदगावकर यांच्याकडून लिंक पाठवून गुगल पेद्वारे तीनवेळा वेगवेगळ्या रक्कमा मिळून एकूण १७ हजार ८०६ रुपये आपल्या खात्यात भरून घेतले.

आदर्श नगर कुवारबाव येथे राहणारे संदीप नांदगावकर यांची ओला इलेक्ट्रिकल स्कूटरच्या दुरुस्तीपोटी १७ हजार ८०६ रुपयांची फसवणूक झाली. संदीप नांदगावकर यांनी पुण्यातील ओला कंपनीकडून दीड लाख रुपयांना ऑनलाईन इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेतली होती. या स्कूटरचे वायरिंग उंदरांनी कुरतडल्याने ती बंद पडली. त्यामुळे त्यांनी ओला कंपनीच्या केअर सेंटरवर याबाबत तक्रार नोंदवली.

त्यानंतर श्री. नांदगावकर यांच्या मोबाईलवर प्रवीण पांडे नावाच्या इसमाचा फोन आला. आम्ही सर्व्हिस सेंटरमधून बोलत असून तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण कॉन्ट्रॅक्ट होत नाही, असा मेसेज आला होता. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर तुमची स्कूटर आमच्या येथे कामाकरिता पोहोचली असून स्कूटरचा इन्शुरन्स काढला आहे का, याची चौकशी केली.

श्री. नांदगावकर यांनी इन्शुरन्स असल्याचे सांगितल्यावर प्रवीण पांडे या इसमाने तुम्हाला कामाचे पैसे आधी भरायला लागतील आणि त्यानंतर इन्शुरन्सकडे क्लेम केल्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील, असे सांगून श्री. नांदगावकर यांच्याकडून लिंक पाठवून गुगल पेद्वारे तीनवेळा वेगवेगळ्या रक्कमा मिळून एकूण १७ हजार ८०६ रुपये आपल्या खात्यात भरून घेतले.

दरम्यान, ओला कंपनीकडून फिर्यादी यांना पुन्हा फोन आला असता त्यांनी स्कूटरच्या दुरुस्तीपोटी १२ ते १३ हजार रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले. तेव्हा फिर्यादी यांनी ही रक्कम प्रवीण पांडे यांना दिल्याचे सांगितले. मात्र कंपनीचे प्रतिनिधी धवल यांनी आमच्याकडे प्रवीण पांडे नामक कोणीही इसम काम करीत नसल्याचे सांगून कंपनीने कोणतेही पैसे भरण्यास सांगितले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यावर श्री. नांदगावकर यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली.

RELATED ARTICLES

Most Popular