26.7 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

मेरा ई-केवायसी अॅप टाळेल रेशनकार्ड रद्दची कारवाई

ई-केवायसी अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ३ लाख ३...

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी रत्नागिरीत बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

'माझी मुलगी सुखप्रीत हिच्याशी जसमिक सिंग याने...
HomeRatnagiriपोलीस असल्याचा बनाव करत, वृद्धेची लाखोंची फसवणूक

पोलीस असल्याचा बनाव करत, वृद्धेची लाखोंची फसवणूक

एका वृद्ध महिलेला पोलीस असल्याची बतावणी करत तिच्याकडील एकूण १ लाख ४० हजार लुटल्याची महिलेने तक्रार दाखल केली आहे.

रत्नागिरी शहरातील भर वस्तीच्या शिवाजी नगर परिसरामध्ये एका वृद्ध महिलेला पोलीस असल्याची बतावणी करत तिच्याकडील एकूण १ लाख ४० हजार लुटल्याची महिलेने तक्रार दाखल केली आहे. यामध्ये या महिलेच्या मंगळसूत्र व सोन्याच्या बांगडया घेऊन चोरीस गेल्या असून याप्रकरणी दोन संशयितां विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना शनिवार ७ मे रोजी सायंकाळी ५.४५ वा.धन्वंतरी हॉस्पिटलजवळ घडली.याबाबत श्रद्धा शिवाजी पावसकर वय ६२, रा.आरोग्य मंदिर, रत्नागिरी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार,शनिवारी सायंकाळी त्या नेहमीप्रमाणे आरोग्य मंदिर ते नरहर वसाहत अशा चालत जात होत्या. त्या धन्वंतरी हॉस्पिटलजवळील फोम वॉश रॅम्प येथे दोन अज्ञातांनी त्यांना पाठीमागून हाक मारली. आणि त्यांनी अंगावर घातलेल्या दागिन्यांबद्दल त्यांना जागरूक करत, एकटे दुकटे असताना एवढे सोन्याचे दागिने अंगावर घालून फिरू नका असे बजावले. आम्ही पोलीस आहोत, ते दागिने आमच्याकडे द्या आम्ही सांभाळून ठेवतो.

पोलीस जागरूक करत आहेत म्हटल्यावर श्रद्धा पावसकर या महिलेने त्यांच्यावर विश्वास ठेवत यांच्याकडील मंगळसूत्र व सोन्याच्या २ बांगडया त्यांच्याकडे सुपूर्द केल्या. त्या त्यांनी घेऊन त्या बदल्यात वेगळ्या धातूच्या बांगड्या कागदात बांधून त्यांना परत दिल्या. परंतु काही वेळाने त्यांना संशय बळावला आणि त्यांनी कागदात गुंडाळलेले दागिने उघडून पहिले असता, ते खोटे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular