29.2 C
Ratnagiri
Friday, May 17, 2024

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गोविंदाने स्टेजवर केला डान्स

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी गोविंदा पुन्हा राजकारणात...

मतदान प्रक्रियेसाठी एसटी बसेस आरक्षित झाल्याने प्रवाशांचे नियोजन फिस्कटले…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील येथील एसटी आगाराच्या...

उपासमारीची वेळ पाणलोट सचिवांचा आंदोलन छेडण्याचा इशारा…

प्रधानमंत्री कृषी सिंचन पाणलोट विकास योजनेअंतर्गत गेल्या...
HomeDapoliहर्णे बंदरासमोर अन्नपूर्णा नौकेला जलसमाधी,लाखोंचे नुकसान

हर्णे बंदरासमोर अन्नपूर्णा नौकेला जलसमाधी,लाखोंचे नुकसान

हर्णे बंदराजवळ असलेल्या बत्तीसमोर बोट आली व प्रचंड सोसाट्याचा वारा आणि प्रचंड लाटा यांमुळे बोटीचा मुख्य भाग निखळला.

रायगड जिल्हयात हरिहरेश्वर येथे खोल समुद्रात मच्छीमारी करण्यासाठी गेलेली अन्नपूर्णा बोट समुद्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भर समुद्रात ही बोट अचानक बंद पडल्यानंतर ही बोट दुसऱ्या बोटीच्या मदतीने हर्णे येथे आणत असताना अगदी थोडे अंतर शिल्लक असताना हर्णे बंदराजवळ तिला जलसमाधी मिळाल्याची घटना घडली आहे.

भर समुद्रात बंद पडलेल्या नौकेचे नाव अन्नपूर्णा आहे. बोट बंद पडल्यावर तत्काळ जवळच असलेल्या बोटीशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर ‘अल हम्द’ IND-MH-४-MM-4 १५० ही नौका विलंब न करता त्वरित मदतीला धावली. या मदतीमुळे चांगा भोईणकर, नंदकुमार चांगा भोईणकर हे सुखरूप बचावले आहेत. या बोटीने बंद पडलेल्या अन्नपूर्ण या बोटीला खेचून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.

पण हर्णे बंदराजवळ असलेल्या बत्तीसमोर बोट आली व प्रचंड सोसाट्याचा वारा आणि प्रचंड लाटा यांमुळे बोटीचा मुख्य भाग निखळला. हर्णे बंदरात बत्तीजवळ येता येता या बोटीचे अक्षरशः दोन तुकडे झाले होते. त्यामुळे तिथेच ती बुडाली. या दुर्घटनेमध्ये बोटीचे तब्बल चार लाख साठ हजार रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. ही दोन सिलेंडरची बोट होती.

हि सर्व घटना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. केळशी उटंबर येथील चांगा भोईनकर यांच्या मालिकीची ही बोट आहे. दरम्यान या सगळ्या घटनेची माहिती मिळताच महसूल कर्मचारी अमित शिगवण, बंदर परवाना अधिकारी दिप्ती साळवी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्याची कार्यवाही केली.  या घटनेमध्ये बुडताना बोटीवरील जाळी, भांडी आदी सगळेच सामान डोळ्यासमोर सर्व वाहून गेले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular