23.2 C
Ratnagiri
Thursday, February 13, 2025

बारावी परीक्षा ३८ केंद्रांवर सुरूपुष्प देऊन प्रोत्साहन…

बारावीच्या लेखी परीक्षेला आज शांततेत सुरुवात झाली....

चारचाकी असलेल्या बहिणी अडचणीत, जिल्हा प्रशासनाला यादी प्राप्त

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत लाभार्थी असलेल्या...
HomeChiplunजुनी पेन्शन योजना देणार ३ महिन्यात निर्णयः अर्थमंत्री अजितदादा पवार

जुनी पेन्शन योजना देणार ३ महिन्यात निर्णयः अर्थमंत्री अजितदादा पवार

पेन्शनबाबत योग्य पद्धतीने न्याय दिला जाईल, असे अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले.

शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देण्याचा निर्णय येत्या ३ महिन्यात घेवू अशी घोषणा अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी विधानसभेत केली. २ जुलै रोजी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी यांनी जोरदार आंदोलन केले. राज्यातील निमशासकीय व अनुदानित संस्थांमध्ये काम करणारे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी १ नोव्हेंबर २००५ पूर्वी निघालेल्या जाहिरातीनुसार त्यानंतरच्या कालावधी सेवेत रुजू झाले, असल्यास त्यांनाही जुन्या निवृत्ती पेन्शन योजनेचा निर्णय पुढील तीन महिन्याच्या आंत घेण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

२००५ नंतर व त्यापूर्वी व त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय शासनाद्वारे नुकताच देण्यात आला आहे. या निर्णयात केवळ शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धरतीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम १९८२ व १९८४ सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम तरतुदी लागू करण्यासाठी एक पर्याय निवडण्याचा विकल्प देण्यात आला आहे. निमशासकीय व अनुदानित संस्थांमध्ये काम करणाऱ्या शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने त्यांच्या बाबतीत हा निर्णय लागू करण्यात आला नाही.

याबाबत सर्वोच्च न्यायालया जो निर्णय देईल त्याची कार्यवाही राज्य शासनामार्फत करण्यात येईल असे आश्वासन ना. अजित पवार यांनी दिले आहे. सरकार अधिकारी, कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. पेन्शनबाबत योग्य पद्धतीने न्याय दिला जाईल, असे अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले. ३ महिन्याच्या आत जुन्या पेन्शन बाबत सकारात्मक निर्णय होणार आहे. अजित पवार यांच्या या घोषणेचे महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अनिलकुमार जोशी यांनी स्वागत केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular