27.9 C
Ratnagiri
Saturday, May 10, 2025

निधी अभावी काजू तारण योजना पडली बंद – कृषी उत्पन्न बाजार समिती

बदलत्या हवामानाच्या परिणामामुळे दरवर्षी काजूची उत्पादकता घटलेली...

पाईपलाईनचे काम अखेर सुरू, शीळ धरण ते जॅकवेल परिसर

शीळ धरण कालवा ते जॅकवेलपर्यंतची " सुमारे...

जिल्हाभरात दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ

सलग दुसऱ्या दिवशी सकाळीच पडलेल्या पावसाने जिल्हावासीयांना...
HomeMaharashtraशिवसेनेकडून विधान परिषद निवडणुकीसाठी सुनील शिंदे यांना उमेदवारी

शिवसेनेकडून विधान परिषद निवडणुकीसाठी सुनील शिंदे यांना उमेदवारी

राज्यामध्ये विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून, ज्या उमेदवारांचा कार्यकाल संपत येत आहे . त्यांच्या जागी नवीन कोणाची वर्णी लागणार कि जुन्याच उमेदवारांना संधी देण्यात येणार? यासाठी विविध पक्षांचे कोण उमेदवार निवडणूक रिंगणात उभे करणार याकडे लक्ष लागून आहे.

शिवसेनेचे जेष्ठ नेते रामदास कदम यांच्या कथित ऑडियो क्लिप वरून मागील काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हल्लकलोळ माजला होता. अनेक प्रकारचे तर्क वितर्क त्यावेळी काढण्यात आले होते. विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होते. त्यामुळे वरिष्ठ नेते रामदास कदमांवर नाराज असल्याचे चर्चिले जात होते.

शिवसेना नेते रामदास कदम यांच्या जागी सुनील शिंदे यांना संधी मिळाली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेने सुनील शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रामदास कदम यांच्यावर पक्षनेतृत्व नाराज असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभुमीवर सुनील शिंदे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याने माध्यमांनी आज शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याशी संवाद साधला.

सुनील शिंदे हे कडवट शिवसैनिक आहेत. रामदास कदम सुद्धा कडवट शिवसैनिक आहेत. त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून पक्षाचं नेतृत्व केलं, काम केल आहे. सुनील शिंदे वरळीचे आमदार होते. आदित्य ठाकरेंसाठी त्यांनी जागा सोडली. हा सुद्धा त्याग आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्या त्यागाचं, निष्ठेचं स्मरण ठेवलं आणि त्यांना संधी दिली” असे संजय राऊत म्हणाले. “रामदास कदम यांनी अनेक वर्ष पक्षासाठी काम केलय. आमदार, मंत्री होते. ते आमचे सहकारी आहेत” असे संजय राऊत म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular