23.4 C
Ratnagiri
Saturday, February 7, 2026

रत्नागिरीत पार्किंगच्या जागेत बाग – स्मार्ट सिटी योजना

शहरातील मारुती मंदिर स्टेडियमच्या बाजूला असणाऱ्या पार्किंगच्या...

विमान अपघाताच्या चौकशीत धक्कादायक बाब आली समोर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीला...

शनिवारच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज, पोलिसांचांही तगडा बंदोबस्त

रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक...
HomeEntertainmentशाहरुखच्या वाढदिनी “या” चित्रपटाचा टीझर होणार प्रदर्शित

शाहरुखच्या वाढदिनी “या” चित्रपटाचा टीझर होणार प्रदर्शित

याशिवाय शाहरुखचा ऑल टाइम ग्रेट चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ पुन्हा प्रदर्शित करण्याची तयारीही सुरू आहे.

शाहरुख खान २ नोव्हेंबरला त्याचा ५७ वा वाढदिवस साजरा करणार आहे. यावेळी शाहरुखचा वाढदिवस अनेक अर्थाने खास असणार आहे कारण या दिवशी त्याच्या बहुप्रतिक्षित ‘पठाण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार आहे. मीडिया सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यशराज फिल्म्सने शाहरुखच्या वाढदिवसाला चित्रपटाचा टीझर रिलीज करण्याची योजना आखली आहे. याशिवाय शाहरुखचा ऑल टाइम ग्रेट चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ पुन्हा प्रदर्शित करण्याची तयारीही सुरू आहे.

शाहरुख खानचा गेल्या चार वर्षांपासून कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित झालेला नाही, साहजिकच त्याचे चाहते पठाणची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी चाहत्यांना एक नाही तर दोन खुशखबर देण्याची तयारी केली आहे. मीडिया सूत्रांच्या माहितीनुसार, पठाणचा टीझर शाहरुख खानच्या वाढदिवसाला म्हणजेच २ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे, तसेच ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ देखील देशातील निवडक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

२० ऑक्टोबर १९९५ रोजी प्रदर्शित झालेला दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा भारताच्या इतिहासातील चित्रपटगृहांमध्ये सर्वाधिक काळ चालणारा चित्रपट आहे. मुंबईतील मराठा मंदिर सिनेमागृहात २७ वर्षांपासून हा चित्रपट अविरतपणे सुरू आहे. आता सूत्रांवर विश्वास ठेवला तर, शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त हा चित्रपट देशातील निवडक शहरांमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार आहे. मुंबई, दिल्ली एनसीआर, कोलकाता, कानपूर, अहमदाबाद, लखनौ, पुणे आणि सुरत येथील पीव्हीआर थिएटर्सनेही बुकिंग सुरू केले आहे.

तिकिटांचे दरही १०० रुपयांच्या आसपास ठेवण्यात आले आहेत. शाहरुख खान व्यतिरिक्त पठाणमध्ये दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही भूमिका आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली एक स्पाय थ्रिलर चित्रपट आहे.

RELATED ARTICLES

Most Popular