29.1 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

कुंभार्ली घाटाचे सोनपात्र घाट असे नामांतर करण्याची सकल धनगर समाजाची मागणी

सोनबा धनगर बांधवाची आठवण सदैव टिकवून ठेवण्यासाठी...

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...
HomeChiplunचिपळुणात एक 'सीएनजी' एसटीसाठी आरक्षित - आगाराचा प्रस्ताव

चिपळुणात एक ‘सीएनजी’ एसटीसाठी आरक्षित – आगाराचा प्रस्ताव

जवळपास पाच हजार एसटीची वाहने कोकणात दाखल होणार आहेत. 

शहरातील शिवाजीनगर बसस्थानक परिसरातील सीएनजी पंपावर सीएनजी भरण्यासाठी वाहने उभी राहिल्यानंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूककोंडी होते. मुंबईतून येणारी वाहने सीएनजी भरण्यासाठी येथे उभी केली जातात. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या सीएनजीवर चालणाऱ्या एसटींना सीएनजी मिळत नाही. या समस्येवर पर्याय म्हणून शिवाजीनगर बसस्थानक परिसरातील सीएनजी पंप केवळ महामंडळाच्या एसटीसाठी आरक्षित ठेवण्याचा पर्याय चिपळूण आगाराने काढला आहे. प्रशासनाने त्याला मंजुरी दिली तर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण शहरात होणारी वाहतूक कोंडी टाळता येईल. त्याशिवाय एसटीने येणाऱ्या चाकरमान्यांना वेळेत घर गाठता येईल. गणेशोत्सव काळात सीएनजीवर चालणारी हजारो वाहने कोकणात दाखल होतात.

सीएनजीवर चालणारी वाहने एकदा सीएनजी भरल्यानंतर २०० ते २५० किलोमीटरचा प्रवास करतात. त्यामुळे मुंबईतून सीएनजी भरून येणाऱ्या वाहनांचा सीएनजी चिपळूणच्या जवळपास आल्यानंतर संपतो. त्यामुळे ही वाहने सीएनजी भरण्यासाठी चिपळूण परिसरातील पंपावर गर्दी करतात. शिवाजीनगर बसस्थानक परिसरातील सीएनजी पंपावर राज्य परिवहन महामंडळाचे खाते आहे. पंपाची काही जागा एसटीच्या मालकीची आहे. त्यामुळे येथे एसटीला सीएनजी भरण्यासाठी प्राधान्य दिले जाते. गणेशोत्सव काळात मुंबई, बोरिवली, वसई, ठाणे, विरार, पनवेल, पुणे, बारामतीसह राज्याच्या वेगवेगळ्या भागातून जवळपास पाच हजार एसटीची वाहने कोकणात दाखल होणार आहेत.

यातील बहुतांशी वाहने सीएनजीवर चालणारी आहेत. या वाहनांना शिवाजीनगर बसस्थानकातील सीएनजी पंप हे एकमेव आधार आहे; मात्र या ठिकाणी एसटीसह खासगी वाहने सीएनजी भरण्यासाठी उभी केली जातात. त्यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूने पाच ते सात किलोमीटरच्या रांगा लागतात. महामार्गाचा सेवारस्ता अरुंद आहे. शिवाजीनगरचा सीएनजी पंप बसस्थानकाला लागून आहे. या ठिकाणी रिक्षा आणि खासगी वाहने रांगेत उभी केल्यानंतर एसटी बसला बसस्थानकात प्रवेश करताना आणि बसस्थानकावरून बाहेर येताना अडचण होते. या सर्व अडचणींवर पर्याय म्हणून शिवाजीनगरचा सीएनजी पंप केवळ एसटीसाठी आरक्षित राहावा, असा पर्याय चिपळूण आगाराने काढला आहे तसा प्रस्ताव आगाराकडून प्रशासनाला देण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular