अनेक प्रकारच्या ऑनलाईन फसवणूक होत असतात. त्यामुळे महाराष्ट्र सायबर पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे कि, अशा फसवणूक करणाऱ्या अँपपासून सावध राहून व्यवहार करावेत. त्याचप्रमाणे गुगल प्ले स्टोअर वरून एखादे अँप डाउनलोड करून तुम्ही माहिती भरण्यासाठी लिंक पाठवली जाते. परंतु, अशा फसव्या लिंक मुळे तुमचे बँक खाते रिकामे होण्याचे जास्त चान्स असतात. त्यामुळे बँक कर्मचारी आणि पोलीस कायम अशा फसवणुकीबाबत जनतेला जागरूक करत असतात.
सध्या ऑनलाईन अँपद्वारे होणाऱ्या आर्थिक व्यवहारामध्ये वाढ झाली आहे. इंटरनेटद्वारे मोबाइलची हाताळणी करताना अनेक जाहिराती येत असतात. त्यात एका क्लिकवर ऑनलाइन कर्ज, अशा जाहिराती सातत्याने दिसतात. या जाहिरातीला क्लिक केले की ते संबंधित अँप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. अशा बोगस लोन अँपच्या माध्यामातून नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन महाराष्ट्र सायबर पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भात गुगल प्ले स्टोरला पत्र लिहित अशी बोगस अँप प्ले स्टोरमधून कढून टाका किंवा डिलीट करा अशी सूचना केली आहे.
डिजिटल बॅंकिंग किंवा ऑनलाइन पद्धतीने अर्थिक व्यवहार करताना फसवणुकीचे किंवा फ्रॉडचे प्रकारदेखील वाढले आहेत. कर्ज देणारे अनेक लोन अँप हे बनावट असतात आणि त्यांचा हेतू लोकांना फसवणे हाच असतो. अशा १३ बोगस अँपची यादी हाती लागल्यानंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुगल प्ले स्टोरला एक पत्र लिहले आहे. संबंधित १३ अॅप तुमच्या नियम व अटींची पुर्तता करत नसतील तर त्या अँपना तुमच्या प्ले स्टोरमधून काढून टाका अथवा डिलीट करा अशी सूचना केली आहे.