29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeRatnagiriजिल्ह्यात सायबर गुन्ह्यात प्रथमच आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश

जिल्ह्यात सायबर गुन्ह्यात प्रथमच आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश

त्या अज्ञात इसमाने सांगितले कि, त्यांच्या क्रेडिट कार्डवर क्रेडिट सिक्युरिटी प्लॅन क्रियाशील झाला आहे.

गुहागर तालुक्यातील सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या महिलेला फेब्रुवारी २०२२ मध्ये दिल्लीच्या ठिकाणावरून एक निनावी फोन आला. त्यावर त्या अज्ञात इसमाने सांगितले कि, त्यांच्या क्रेडिट कार्डवर क्रेडिट सिक्युरिटी प्लॅन क्रियाशील झाला आहे. त्यामुळे दरमहा आपल्याला २४०० रुपये भरावे लागणार आहेत. आणि जर हे पैसे भरायचे नसतील, हा प्लॅन रद्द करायचा असेल, तर आपल्या क्रेडिट कार्डचा १६ अंकी क्रमांक द्या.

संबंधित महिलेने क्रेडिट कार्ड क्रमांक समोरील व्यक्तीला दिल्यावर, आणखी बोलण्यात गुंतवून या व्यक्तीने महिलेकडून व्ही. व्ही. क्रमांक व ओटीपी देखील मागून घेतला. ओटीपी मिळाल्यावर अवघ्या दहा मिनिटांनी या महिलेच्या खात्यातून ७९ हजार ९९२ रुपये दिल्लीमधील दुसऱ्या बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर झाल्याचा मेसेज आला. त्यावेळी अशाप्रकारे अज्ञाताला आपण क्रेडिट कार्ड क्रमांक आणि माहिती दिल्याने फसवले गेल्याची जाणीव या महिलेला झाली.

१४ फेब्रुवारीला या महिलेने याबाबतची तक्रार गुहागर पोलिसांकडे केली होती. माहिती तंत्रज्ञान कायदा व फसवणुकीच्या कलमांखाली पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. पोलिसांना यातील एक लाभार्थीचे बँक खाते हे विशालसिंग राजेंद्रसिंह शेखावत, रा. जयपूर बेंनार रोड, जिल्हा जयपूर, राजस्थान याचे असल्याचे कळले. या गुन्ह्याच्या चौकशीत विशाल याने ‘हाउसिंग डॉट कॉम’ या बनावट लिंकद्वारे प्रथम फर्स्ट डाटा या मर्चंट मशिनद्वारे पैसे घेतले. त्यानंतर ही रक्कम आपल्या खात्यामध्ये ट्रान्स्फर केली. पुढे ही रक्कम दिल्ली येथील एटीएमद्वारे काढून घेतली असल्याचे सांगितले. गुहागर पोलिसांनी राजस्थानमध्ये जाऊन सायबर क्राईम गुन्ह्यातील एका आरोपीला अटक केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिसांना सायबर गुन्ह्यात प्रथमच आरोपीपर्यंत पोचण्यात यश आले. त्यामुळे गुहागर पोलिसांचे वरिष्ठांकडून कौतुक होत आहे. पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी यांच्या देखरेखीखाली सहायक पोलिस निरीक्षक तुषार पाचपुते, हवालदार हनुमंत नलावडे, पोलिस नाईक राजेश धनावडे, कॉन्स्टेबल वैभव ओहोळ, तसेच तांत्रिक विश्लेषण पथकाचे हवालदार रमिझ शेख यांच्या टीमने तपास केला.

RELATED ARTICLES

Most Popular