24.6 C
Ratnagiri
Thursday, February 20, 2025

अपघातांमुळे कुंभार्ली घाटात वाहतूक कोंडी, वारंवार घडतात घटना

कुंभार्ली घाटातील रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली...

बसरा स्टार बनले ‘पर्यटन स्पॉट’, स्थानिकांना रोजगार

येथील मिऱ्या किनाऱ्यावर निसर्ग चक्रीवादळामुळे अडकून पडलेले...

सागरी क्षेत्रात अंमलबजावणी कक्ष स्थापन – मत्स्यव्यवसायमंत्री नीतेश राणे

सागरी क्षेत्रात अनधिकृतपणे परराज्यातील मासेमारी नौकांकडून होणारी...
HomeMaharashtraदिल्लीतील साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन...

दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’!

मराठीचा ‘ऑनलाइन जागर’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.

दि. 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने अभिजात मराठीचा ‘ऑनलाइन जागर’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात आपल्या कलागुणांचा व्हिडिओ शेअर करून देश विदेशातील मराठी माणसांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमात कसे सहभागी व्हाल? आपण स्वतः कवी, लेखक, कलाकार, गायक असाल तर आपल्या स्वरचित कवितेचा अथवा आपल्या कलाकृतीचा एक सुंदर व्हिडिओ तयार करून आम्हाला पाठवा. केवळ आपल्याच कविता नाही तर इतर मान्यवर कवींच्या कवितांचे सादरीकरणही ( वाचन )आपण करू शकता. याबरोबरच गझल वाचन, गायन, लोककला सादरीकरण अशा अनेक स्वरूपात आपण या उपक्रमात सहभागी होऊ शकता. अभिजात मराठीच्या या ऑनलाईन जागरामध्ये आपण अभंग, पोवाडे, नाट्यछटा, लघुकथा, गायन, भारुड आधी कलांच्या माध्यमातून सहभागी होऊ शकता.

अभिजात मराठीच्या या उत्सवात आपला सहभाग हा आपल्या भाषेचा गौरव वाढविणारा ठरेल. तर चला मग करा रेकॉर्ड आपला व्हिडिओ आणि पाठवा आम्हाला. आपले व्हिडिओ हे माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘महासंवाद’ या पोर्टल वर आणि महासंचालनालयाच्या राज्यभरातील कार्यालयांच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात येतील. आपले व्हिडिओ इथे पाठवा. ईमेल: ratnagiridio@gmail.com आणि dgiprdlo@gmail.com या ईमेलवर अथवा
या व्हॉट्सअँप क्रमांकावर. 9403464101, ९८९२६६०९३३ आणि ७५०४६९६७८६. महाराष्ट्राला साहित्याची समृद्ध परंपरा लाभली आहे. ९८ वे अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी भाषेच्या श्रीमंतीचा उत्सव साजरा करण्याची संधी आहे.

आपल्या शब्दांनी आणि कलाकृतींनी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अधिक संस्मरणीय बनवावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात येत आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरीच्या खालील समाजमाध्यमांवर उत्कृष्ट व्हिडिओ व कलाकृतीला प्रसिद्धी देण्यात येईल –
X = https://x.com/InfoRatnagiri Facebook – https://www.facebook.com/DioRatnagiri
Youtube channel – Dio Ratnagiri

RELATED ARTICLES

Most Popular