29.6 C
Ratnagiri
Monday, June 9, 2025

कोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः...

दररोज कचरा द्या, बक्षीस गुण मिळवा, चिपळूण पालिकेचा उपक्रम

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा संकलन मोहिमेत चिपळूण...

गांजा प्रकरणी आणखी एकाला अटक – महाड कनेक्शन

गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर येथील...
HomeRatnagiriकै.संजीव साळवी स्मृतीदिनी राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धा

कै.संजीव साळवी स्मृतीदिनी राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धा

रत्नागिरी आणि गोवामधील प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर आणि मॉडलिंग फोटोग्राफीसाठी अपार मेहनत घेऊन आपली कार्यकुशलता सिद्ध केलेले कै.संजीव साळवी याचे मागील वर्षी निधन झाले. त्यांच्या स्मृतीदिनी वाय फाय फोटोलव्हर्स आणि ९५ फॅमिली आयोजित राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

मरावे परि कीर्तीरूपी उरावे, असे रत्नागिरीचे सुपुत्र कै. संजीव साळवी हे महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये मॉडलिंग फोटोग्राफीसाठी खूप प्रसिद्ध असे व्यक्तिमत्व होते. रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या १९९५ उत्तीर्ण बॅचच्या विद्यार्थ्यांनी ९५ कलाकार ग्रुपने संजीव साळवी यांची स्मृती कायम रहावी यासाठी युथ फेस्टिवल आर्टिस्ट असोसिएशनच्या मदतीने सदर फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन केले आहे. गेली दोन वर्ष महाराष्ट्राभर अनेक नामवंत फोटोग्राफर संघटित करून वायफा फोटोलव्हर्स ग्रुप मार्फत अनेक राज्यस्तरीय फोटोग्राफीच्या विविध विषयावर कायम उपक्रम राबवले जातात.

या स्पर्धेची नियमावली खालीलप्रमाणे देण्यात आली आहे. काही अटी शर्थी लागू करण्यात आल्या आहेत. इच्छुकांनी जरूर सहभाग नोंदवावा. संजीव साळवी राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धा ही ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. या स्पर्धेच स्वरूप खालीलप्रमाणे असेल.

  • या स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असेल.
  • १३ जुलैपर्यंत आपले मॉडेलिंग फोटोग्राफी किंवा पोट्रेट फोटोग्राफी या विभागातील आपला सर्वोत्तम फोटो पाठवायचा आहे.
  • सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे ई-प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
  • विजेत्या स्पर्धकांना रोख रकमेची पारितोषिके देण्यात येतील.
  • स्पर्धेचा निकाल १४ जुलै २०२१ रोजी म्हणजे कै. संजीव साळवीच्या स्मृती दिनी जाहीर करण्यात येणार आहे.
  • सर्व वयोगटासाठी हि स्पर्धा खुली राहील.
  • फोटोग्राफीसाठी कॅमेरा किंवा मोबाइलचा वापर करू शकता.
  • स्पर्धेचे सर्व हक्क आयोजकांकडे राखीव राहतील.

या स्पर्धेबाबत अधिकच्या माहितीसाठी, प्रा. शुभम पांचाळ यांच्याशी 7038445867 या क्रमांकावर संपर्क साधावा. सदर स्पर्धेचे संयोजन बिपिन बंदरकर, प्रा.डॉ. आनंद आंबेकर आणि संजीव साळवी यांचे चिरंजीव कुणाल संजीव साळवी करत आहेत. जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवण्याचे, आवाहन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular