26.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriजिल्ह्यातील फक्त चार शाळा सुरु

जिल्ह्यातील फक्त चार शाळा सुरु

महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीचा समावेश असल्यामुळे मुलांना यावर्षी शाळेत पाठविण्याबाबत पालकांमध्ये संभ्रम परिस्थिती आहे. शासनाने कोरोनामुक्त गावात १३  जुलैपासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले होते. शासनाने कोरोना नसलेल्या गावात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दोन तालुक्यातील फक्त चार शाळांमध्ये २२३ विद्यार्थी उपस्थित होते. कोरोनाचे सर्व निर्बंध पाळून पालकांच्या संमतीपत्रानंतर या ठिकाणी प्रथम शाळा भरली आहे.

शिक्षण विभागाने शाळा स्तरावर सरपंच, तलाठी, शाळा व्यवस्थापन समिती, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांच्या संयुक्त समितीने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून चर्चेतून निर्णय घेत ठराव मंजूर करुन कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. शाळा सुरू करण्यापूर्वी त्या गावात किमान एक महिना तरी कोरोना रूग्ण आढळून येता कामा नये, ही महत्त्वपूर्ण अट त्यामध्ये नमूद करण्यात आली होती. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात माध्यमिक शिक्षण विभागाकडून संबंधित सुचना देखील देण्यात आल्या होत्या.

राजापूर आणि दापोली तालुक्यातील प्रत्येकी दोन शाळांमध्ये प्रत्यक्ष अध्यापनाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात माध्यमिकच्या एकुण ४६५  शाळा असून त्यामध्ये १ लाख ९२५ विद्यार्थी प्रविष्ट आहेत. पहिली लाट ओसरल्यानंतर, शाळेतील प्रत्यक्ष अध्यापन सुरु करण्याला ग्रामीण भागातून प्रतिसाद मिळालेला, मात्र दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातूनच बाधित रुग्णांची संख्या अधिक सापडल्याने, पालक सुद्धा अजुनही भितीच्या छायेखाली आहेत. सध्याच्या अहवालानुसार एकही बाधित नसलेल्या गावांची संख्या प्रमाण घटत चालल्याची माहिती मिळाली आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील कमी पटसंखेच्या शाळांमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनोचे इतर नियम पाळणे शक्य आहे, परंतु, शहरातील माध्यमिक शाळांचे नियोजन योग्य तर्हेने करणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES

Most Popular