27.7 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeMaharashtraना. नितेश राणेंना ओपन चॅलेंज बुरखा घालूनच परीक्षा देणार!

ना. नितेश राणेंना ओपन चॅलेंज बुरखा घालूनच परीक्षा देणार!

नांदगाव एच. आर. हायस्कूलच्या इयत्ता दहावीतील मुस्लीम विद्यार्थिनींनी ना. राणेंना दिलं आहे.

‘बुरखा हा आमच्या धर्माचा विषय आहे, आस्थेचा विषय आहे. त्यामुळे आम्ही बुरखा घालूनच परीक्षा देणार’. असं ओपन चॅलेंज नाशिकच्या नांदगाव येथील एच. आर. हायस्कूलच्या इयत्ता दहावीतील मुस्लीम विद्यार्थिनींनी ना. राणेंना दिलं आहे. तसेच, मंत्री ना. नितेश राणे मुद्दाम एका विशिष्ट सम ाजाला टार्गेट करत आहेत असा गंभीर आरोप करत या विद्यार्थिनींनी शालेय शिक्षण मंत्री ना. दादा भुसेंना ना. नितेश राणेंविरोधात कारवाई करण्यात विनंती केली.

शिक्षण आणि धर्म वेगळा – भिवंडीतील विद्यार्थिनींनीही ना. नितेश राणेंच्या मागणीला विरोध दर्शवला आहे. धर्म आणि शिक्षण हा वेगळा भाग आहे. शासनाने शिक्षणावर भर दिला पाहिजे. ड्रेसवर, हिजाबवर आणि बुरख्यावर जोर देऊन काही होणार नाही. ज्यांना कॉपी करायची आहे ते कसेही कॉपी करतील.. भारतात सर्वधर्म समभाव आहे आणि सर्वांना समान अधिकार आहे. त्यामुळे आम्ही ज्या कपड्यात कम्फर्टेबल आहोत, त्याच कपड्यांमध्ये आम्ही परीक्षा देऊ शकतो, अशी प्रतिक्रिया भिवंडीच्या विद्यार्थिनींनी दिली आहे.

ना. राणेंची मागणी – पत्रकार परिषदमध्ये बोलताना ना. नितेश राणे यांनी माध्यमिक शाळेत, उच्च माध्यमिक शाळेत परीक्षेसाठी बुरखा घालून बसण्याची मान्यता दिल्याचं परिपत्रक आहे. असं लागूल चालन चालणार नाही. बुरखा घालून परीक्षेला बसल्याचे इतरही धोके आहेत. याचे धोके लक्षात घेऊन हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी केली होती.

RELATED ARTICLES

Most Popular