29.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeChiplunसंभाजी भिंडेच्या चिपळुण दौऱ्याला विरोध, प्रशासनाला निवेदन

संभाजी भिंडेच्या चिपळुण दौऱ्याला विरोध, प्रशासनाला निवेदन

देशातील महापुरुषांवर सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करणारे संभाजी भिडे यांना या दौऱ्याला येथील राजकीय पक्षांसह सामाजिक संस्था, संघटनानीकडाडून विरोध केला आहे.

देशातील महापुरुषांवर सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करणारे संभाजी भिडे ३ ऑगस्ट रोजी चिपळूण येथे कार्यक्रमासाठी येत आहेत. या दौऱ्याला येथील राजकीय पक्षांसह सामाजिक संस्था, संघटनानीकडाडून विरोध केला आहे. समाजात धार्मिक व सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या भिडेंच्या येथील दौऱ्याला परवानगी नाकारावी, अन्यथा त्यांना येथे पाय ठेवू देणार नाही, असा इशारा विविध संघटनांनी दिला. या संदर्भातील माहिती पत्रकार परिषदेत काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, शहराध्यक्ष लियाकत शाह, फैसल पिलपिले, कबीर काद्री, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख विनोद झगडे, रिपब्लीकन सेनेचे संदेश मोहीते, वंचित बहुजन आघाडीचे सुभाष जाधव, महेश सकपाळ, विलास मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरीष काटकर, मुझफ्फर सय्यद, संभाजी ब्रिगेडचे सुधीर भोसले, सुबोध सावंत देसाई आदीनी दिली.

दौरा झाला तर जोरदार निदर्शने करण्याचा इशाराही दिला. तालुकाध्यक्ष प्रशांत यादव म्हणाले, भिडे यांनी अनेक राष्ट्रपुरुषांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. सामाजिक तेढ निर्माण करून सुस्कृंत महाराष्ट्रात शांतता बिघडवण्याचे काम भिडे करीत आहेत. वादग्रस्त भिडे चिपळूणच्या दौऱ्यावर येत असल्याचे समजते. त्यांच्याबाबत जनमानसात प्रचंड असंतोष आहे. अशा परिस्थितीत भिडेंचा दौरा झाल्यास सुसंस्कृत तसेच सामाजिक सलोखा राखण्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या चिपळूण शहरात त्याचे तीव्र पडसाद उमटतील. चिपळूण तालुका काँग्रेससह शिवसेना, राष्ट्रवादा काग्रेस (शरद पवार गट) रिपब्लिकन सेना, वंचित बहुजन आघाडी, कुणबी सेना, संभाजी ब्रिगेड, पूज्य गांधी प्रतिष्ठान, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम विचार मंच यांच्यासह अनेक सामाजिक संस्था व. संघटनांनी एकत्र येऊन भिडे यांच्या चिपळूण दौऱ्याला तीव्र विरोध केला आहे.

या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कोकणातील सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेत भिडे यांच्या कोकणातील कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अन्यथा त्यांच्या दौऱ्याला कडाडून विरोध करू. भिडे यांच्या चिपळूण दौऱ्याला परवानगी नाकारावी. संघटनांनी या संदर्भात जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी यांनाही राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.’

RELATED ARTICLES

Most Popular