22.8 C
Ratnagiri
Saturday, January 17, 2026

जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती

कोकणासह जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती मिळाला...

हातखंब्याजवळ अपघात, मोटरची दुचाकीला धडक, दापत्य जखमी

रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या मार्गावरील खेडशी महालक्ष्मी...

जि.प. निवडणुकांसाठी जिल्ह्यात महायुती शिवसेना-भाजपसोबत राष्ट्रवादीही येणार?

५ फेब्रुवारीला होणारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी...
HomeKokanकोकण किनारपट्टीला ऑरेंज अॅलर्ट

कोकण किनारपट्टीला ऑरेंज अॅलर्ट

येत्या २४ तासांत चक्रीवादळांची परिस्थिती वाढणार आहे.

अरबी समुद्रात वादळ निर्माण झाल्याने कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. कोकण किनारपट्टीला ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण किनारपट्टी आणि गोव्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केली आहे. गोव्यापासून कोकण किनारपट्टीपर्यंत हवामान विभागाने ऑरेज अलर्ट दिला जारी केला आहे. मच्छीमारांच्या अनेक बोटी बंदरातच असल्याने मच्छीमारांपुढे संकट निर्माण झाले आहे. येत्या २४ तासांत चक्रीवादळांची परिस्थिती वाढणार आहे.

बदललेल्या परिस्थितीमुळे सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत पावसाने सरासरी गाठली आहे. राज्यात आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. त्याचबरोबर दोन दिवस कोकण, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या सर्वच भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular