23.2 C
Ratnagiri
Saturday, January 17, 2026

जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती

कोकणासह जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती मिळाला...

हातखंब्याजवळ अपघात, मोटरची दुचाकीला धडक, दापत्य जखमी

रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या मार्गावरील खेडशी महालक्ष्मी...

जि.प. निवडणुकांसाठी जिल्ह्यात महायुती शिवसेना-भाजपसोबत राष्ट्रवादीही येणार?

५ फेब्रुवारीला होणारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी...
HomeKokanऑस्करची गोष्ट या मराठी लघुपटाला, बेस्ट चिल्ड्रन शॉर्ट फिल्म पुरस्कार प्राप्त

ऑस्करची गोष्ट या मराठी लघुपटाला, बेस्ट चिल्ड्रन शॉर्ट फिल्म पुरस्कार प्राप्त

विशेष म्हणजे यासाठी कोणताही महागडा कॅमेरा अथवा काही सेटींग न वापरता तो एका स्मार्टफोनवर चित्रीत केला गेला आहे.

कोकणच्या मातीत विविध प्रकारचे कलागुण असलेले अवलिया आहेत. फक्त गरज असते ती योग्य त्या दिशादर्शकाची म्हणतात ते वावगे ठरणार नाही. जिल्ह्यात ग्रामीण भागापासून ते शहरी भागामध्ये नाट्य, संगीत, नृत्य, कलाकारी यामध्ये पारंगत असणारे अनेक उदयोन्मुख कलाकार आहेत. त्यातील काहीना मात्र योग्य दिशा मिळाल्याने त्यांनी पुढील पल्ला गाठण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

ग्रामीण भागामध्ये सणा समारंभाला नाटक, छोटे अंक, स्पर्धा भरवल्या जातात. रत्नागिरीतील उक्षी येथील अभिनेता ते लेखक, दिग्दर्शक अशा जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या सुधीर घाणेकरने उस्फुर्तपणे काम करणाऱ्या, तसेच नमनातील कलाकारांना, बाल कलाकारांना घेऊन नमानातील कलाकारांचा जीवन दर्शन घडवणारा ऑस्करची गोष्ट हा लघुपटाची निर्मीती केली आहे. या लघुपटाला सत्यजित ऋत्विक म्रीनल इंटरनॅशनल कोलकत्ता फेस्टिवलमध्ये बेस्ट चिल्ड्रन शॉर्ट फिल्म पुरस्कार प्राप्त झाला आहे.

ऑस्करची गोष्ट हा मराठी लघुपट नमनातील, लहान मुलांना कलाकार संधी देण्यात येऊन कोणत्याही इन्स्टिटयूटमध्ये न शिकता अनुभव आणि केवळ मेहनतीच्या जोरावर बनवण्यात आला आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणताही महागडा कॅमेरा अथवा काही सेटींग न वापरता तो एका स्मार्टफोनवर चित्रीत केला गेला आहे.

अभिनेता सुधीर घाणेकर याने लेखक दिग्दर्शक म्हणून केलेला हा पहिला लघुपट आहे. यामध्ये विशेष करून कोकणातील वैशिष्ट्ये, उक्षीतील जगप्रसिद्ध कातळशिल्पांचे चित्रीकरण, सामान्य शेतकरी, कष्टकरी लोकांचे जीवन, कोकणातील रूढी-परंपरा, निसर्गसौंदर्य, जैवविविधतेचे दर्शन घडविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, दिव्यांग मुलांचे हक्क व त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अधोरिखित करत अवयवदान आणि  शिक्षणाप्रती असणारे महत्व सांगणारी गोष्ट यामध्ये मांडण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular